शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
4
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
5
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
6
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
7
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
8
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
9
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
10
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
11
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
12
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
13
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
14
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
15
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
16
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
17
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
18
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
19
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
20
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?

साहसी उपक्रमातील तज्ञमंडळींच्या पुढाकाराने ' महा अ‍ॅडव्हेंचर कौन्सिल 'ची स्थापना..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2019 15:02 IST

हिमालयातील अतिउंचीवर आयोजित केलेल्या एका पदभ्रमण मोहिमेतील दुर्दैवी घटनेमध्ये आपला मुलगा गमावलेल्या पालकांनी अशा दुर्घटना टाळाव्यात आणि कमी व्हाव्यात या हेतूने एक जनहित याचिका दाखल केली होती.

ठळक मुद्देदुर्दैवी घटना घडल्यानंतर ती ठिकाण बंद करणे हा त्यावरचा मार्ग नाही मॅकला खूप काही करायचे आहे पण सरकारी यंत्रणांचीही मदत लागणार

- नम्रता फडणीसपुणे : पावसाळा सुरू झाला की टेÑकसंर्ना वेध लागतात ते गडकिल्ल्यांचे. काही नवशे-गवशे देखील कोणतीही माहिती न घेता मनसोक्तपणे गडांवर भटकंती करायला जातात. कुणी उत्साहाच्या भरात सेल्फी काढायला जातो अन पाय घसरतो. हिमालयाच्या अतिउंचावरच्या मोहिमांमध्येही काही गियार्रोहकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना  समोर आल्या आहेत. भविष्यात अशा घटनांना आळा घालण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून विविध साहसी उपक्रमात कार्यरत असलेल्या अनुभवी आणि तज्ञ व्यक्ती एकत्र आल्या असून, त्यांनी महाअ‍ॅॅडव्हेंचर कौन्सिल (मॅक) ची स्थापना केली आहे.प्रसिद्ध गियार्रोहक आणि लेखक वसंत वसंत लिमये हे या ह्यमहा अ‍ॅडव्हेंचर कौन्सिलचे अध्यक्ष आहेत. सुरक्षाविषयक मार्गदर्शक तत्वे तयार करणे, साहसी उपक्रम आयोजित करणाऱ्या, त्यात प्रत्यक्ष सहभाग घेणाऱ्या तसेच विविध सेवा उपलब्ध करून देणाऱ्या अशा सर्वांनाच आवश्यक ते मार्गदर्शन उपलब्ध करणे व संबंधित सरकारी खात्यांशी संवाद साधणे अशा विविध पातळ्यांवर मॅक काम करणार आहे. यासंदर्भात वसंत लिमये म्हणाले, हिमालयातील अतिउंचीवर आयोजित केलेल्या एका पदभ्रमण मोहिमेतील दुर्दैवी घटनेमध्ये आपला मुलगा गमावलेल्या पालकांनी अशा दुर्घटना टाळाव्यात आणि कमी व्हाव्यात या हेतूने एक जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या परिणामस्वरूप शासनाने दोन वटहुकूम काढले. त्याला विरोध करण्याच्या निमित्ताने काही मंडळी एकत्र आली. आमचा सरकारच्या सुरक्षिततेच्या मार्गदर्शक सूचनांना नव्हे तर त्या ज्या स्वरूपाच्या सूचना आहेत त्याला विरोध आहे. या वटहुकुमाविरोधात न्यायालयात आम्ही जनहित याचिका सादर केली आहे. पण नुसता विरोध करून उपयोग नाही तर सुरक्षिततेच्या दृष्टीने काहीतरी पावले उचलली गेली पाहिजेत  या दृष्टीकोनातून  महा अ‍ॅडव्हेंचर कौन्सिल (मॅक) च्या स्थापनेचा विचार पुढे आला. कौन्सिलच्या निर्मितीसाठी पाच महिन्यांचा कालावधी लागला. सध्या कौन्सिलच्या सदस्यत्वाची नोंदणी सुरू झाली आहे. गिरीमित्र संमेलनामध्ये मॅकसंदभार्तील घोषणा केली जाणार आहे. पुणे, मुंबई आणि नाशिक, कोल्हापूर याठिकाणी जाऊन बैठका घेतल्या जाणार आहेत. खरंतर अनेकदा असे होते की एखादी गंभीर घटना घडली की बातम्या येतात. पण अशा घटनांचा सातत्याने अभ्यास करून त्या का घडतात? त्या घटनांची नोंद ठेवणे अशा प्रकारचे संशोधन करण्याची गरज आहे. पुढील टप्प्यात शासनाच्या मदतीने एखादे संकेतस्थळ सुरू करता येईल, याचाही विचार केला जाणारआहे. ज्यायोगे त्या संकेतस्थळावर नोंद झाल्यास कोण कुठल्या मोहिमेला गेला आहे याची माहिती मिळू शकेल. हरिहरेश्वर, राजमाची सारख्या ठिकाणांवर आज नियंत्रण आणण्याची आवश्यकता आहे. घटना घडल्यानंतर ती ठिकाण बंद करणे  हा त्यावरचा मार्ग असू शकत नाही.  मॅकला खूप काही करायचे आहे पण सरकारी यंत्रणांचीही मदत लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

............

मॅकची उद्दिष्टे* सध्या अस्तित्वात असलेल्या मार्गदर्शक तत्वांना अनुसरून संशोधनावर आधारित नवीन सर्वसमावेशक मार्गदर्शक तत्व विकसित करणे.* ही मार्गदर्शक तत्वे प्रत्यक्षात उपयोगी आणण्यासाठी विविध संस्थांमध्ये ताळमेळ साधणे.* धोका व्यवस्थापनात सुसंवाद साधण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे.* या क्षेत्रातील विविध घडामोडी सर्वांपर्यंत पोहोचविणे.* आयोजक संस्था, सहभागी, त्यांचे कुटुंबीय आणि सरकार अशा विविध भागधारकांमध्ये सहचर्य वाढवणे आणि त्यांचा पाठिंबा मिळविणे.* साहसी क्रीडा प्रकारातील सुरक्षिततेसंदर्भात सर्वसामान्य जनतेचे प्रबोधन करणे. * आयोजनातील सुरक्षेवर परिणाम करणा-या महत्वाच्या बाबींचे प्रशिक्षण देणे------------------------------------------------------------

टॅग्स :PuneपुणेTrekkingट्रेकिंगAccidentअपघात