शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘कृषी’ची प्रवेशप्रक्रिया आजपासून सुरु : ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी १० जुलैपर्यंत मुदत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2019 12:56 IST

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेमार्फत ही प्रक्रिया  राबविली जाणार आहे. 

ठळक मुद्देएकूण ११ हजार ७३० जागांसाठी ही प्रवेशप्रक्रिया होणार तांत्रिक अडचणींमुळे सीईटी सेलने पूर्वीचे वेळापत्रक केले रद्द

पुणे : राज्यातील कृषी महाविद्यालयांतील कृषी पदवी अभ्यासक्रमांंतील प्रवेशप्रक्रिया शनिवारपासून (दि. २९) सुरू होत आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी १० जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेमार्फत ही प्रक्रिया  राबविली जाणार आहे. राज्यातील चार कृषी विद्यापीठांमधील कृषी, उद्यानविद्या, वनविद्या, मत्स्यविज्ञान, कृषी अभियांत्रिकी, अन्नतंत्रज्ञान, सामुदायिक विज्ञान आणि जैवतंत्रज्ञान या पदवी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशाची जबाबदारी कृषी परिषदेकडे देण्यात आली आहे. एकूण ११ हजार ७३० जागांसाठी ही प्रवेशप्रक्रिया होणार आहे. तांत्रिक अडचणींमुळे सीईटी सेलने पूर्वीचे वेळापत्रक रद्द केले आहे. त्यानंतर शुक्रवारी सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून शनिवारपासून (दि. २९) विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे व अर्ज सादर करण्यासाठी दि. १० जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर दि. १५ जुलैला तात्पुरती गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल. दि. १६ ते २० जुलैदरम्यान ऑनलाईन हरकती घेतल्यानंतर दि. २६ जुलैला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे. प्रवेशप्रक्रियेअंतर्गत एकूण चार नियमित फेऱ्या होणार आहेत. प्रवेशाची संपूर्ण प्रक्रिया कृषी परिषदेच्या संकेतस्थळावरच होणार आहे. त्यानंतर गुणवत्तानिहाय स्पॉट राऊंड घेतला जाणार आहे. या फेरीसाठी निश्चित करण्यात आलेल्या केंद्रांमध्ये प्रत्यक्ष जाऊन विद्यार्थ्यांना गुणवत्तानिहाय प्रवेश मिळेल. त्यानंतर संस्थास्तरावरील कोट्यातील प्रवेशप्रक्रिया राबविली जाईल. ही प्रक्रिया ७ सप्टेंबरपर्यंत चालणार असली तरी दि. १९ आॅगस्ट रोजी अध्यापनाला सुरुवात होणार आहे.......कृषी पदवी वेळापत्रक दि.२९ जून ते १० जुलै : कागदपत्रे अपलोड करणे, अर्ज सादर करणेदि . १५ जुलै : तात्पुरती गुणवत्ता यादीदि. १६ ते २० जुलै : ऑनलाईन हरकतीदि . २६ जुलै : अंतिम गुणवत्ता यादीदि . २८ जुलै : पहिल्या प्रवेश फेरीची निवड यादीदि ३० जुलै ते २ऑगस्ट : संबंधित संस्थेत प्रवेश घेणे, जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करणेदि ३ ऑगस्ट : रिक्त जागा प्रसिद्ध करणेदि ६ ऑगस्ट : दुसऱ्या प्रवेश फेरीची निवड यादीदि   ७ ते ९ ऑगस्ट : .......संबंधित संस्थेत प्रवेश घेणेदि  १० ऑगस्ट : रिक्त जागा प्रसिद्ध करणेदि  १२ ऑगस्ट : तिसऱ्या प्रवेश फेरीची निवड यादीदि . १३, १४ व १६ ऑगस्ट : संबंधित संस्थेत प्रवेश घणेदि . १७ ऑगस्ट : रिक्त जागा प्रसिद्ध करणेदि . १९ ऑगस्ट : चौथ्या प्रवेश फेरीची निवड यादीदि. २० ते २२ ऑगस्ट : संबंधित संस्थेत प्रवेश घेणेदि . २० ते २३ ऑगस्ट : चारही फेऱ्यांमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी संबंधित संस्थेत मूळ कागदपत्रे व शुल्क भरून प्रवेश निश्चित करणेदि. २४ ऑगस्ट : ‘स्पॉट राऊंड’ प्रवेशासाठी ..............रिक्त जागा प्रसिद्ध करणेदि . २६ ते २९ ऑगस्ट : स्पॉट राऊंड प्रवेशप्रक्रियादि. २९ ऑगस्ट : रिक्त जागा प्रसिद्ध करणेदि . ३० व ३१ ऑगस्ट : संस्थानिहाय कोटा प्रवेशासाठी अर्ज करणेदि.२ सप्टेंबर : संस्थेतील गुणवत्ता यादी प्रसिद्धदि. ३ ते ५ सप्टेंबर : संस्थेत प्रवेश घेणेदि . ६ व ७ सप्टेंबर : रिक्त जागांनुसार गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देणे

टॅग्स :PuneपुणेagricultureशेतीStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयEducationशिक्षणGovernmentसरकार