बालसुधारगृहातील मुले होणार अभियंते

By Admin | Updated: November 16, 2014 00:20 IST2014-11-16T00:20:18+5:302014-11-16T00:20:18+5:30

बालसुधारगृहांमध्ये असलेली अनाथ, गुन्हेगारी विळख्यातील किंवा तसेच अन्य काही कारणाने बालन्याय अधिनियमानुसार दाखल झालेली मुले 18 वर्षानंतर बाहेर पडतात

Engineers will have children in the children's room | बालसुधारगृहातील मुले होणार अभियंते

बालसुधारगृहातील मुले होणार अभियंते

हिनाकौसर खान-पिंजार ल्ल पुणो
बालसुधारगृहांमध्ये असलेली अनाथ, गुन्हेगारी विळख्यातील किंवा तसेच अन्य काही कारणाने बालन्याय अधिनियमानुसार दाखल झालेली मुले 18 वर्षानंतर बाहेर पडतात तेव्हा त्यांच्या आयुष्यापुढे जगण्याचा मोठा प्रश्न असतो. धड ना शिक्षण ना कामाचे वय, अशा आडनिडय़ा 
वयात त्यांच्यापुढे भविष्याची बिकट वाट उभी असते. सुधारगृहातील मुलांच्या या अडचणीला शासनाकडून ‘उपक्रमशील’ मदतीचा हात 
मिळणार आहे. 
बालगृहातून बाहेर पडलेल्या मुलांना कंपन्यांमध्ये ‘ऑन जॉब’ प्रशिक्षण देणारा एक उपक्रम सुरू होत असून, त्याअंतर्गत या मुलांना अभियांत्रिकीचे शिक्षण विनामूल्य घेण्याची संधी मिळणार आहे. शासनाच्या महिला व बालविकास विभागाने पुण्यातील ‘यशस्वी इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी’ या संस्थेच्या मदतीने हा उपक्रम राबविणार आहे.  यासंबंधी शासनाच्या ‘कर्मवीर भाऊराव पाटील स्वावलंबन पुनर्वसन योजने’अंतर्गत  सामंजस्य करार करण्यात आला आहे. यात वयाची 18 वर्षे पूर्ण झालेली व 1क्वी पास होऊन सुधारगृहातून बाहेर पडलेल्या विद्याथ्र्याना प्रशिक्षण घेता येणार आहे.
बालसुधारगृहांच्या नियमानुसार,  वयाच्या 18 वर्षानंतर या मुलांना बालगृहांमध्ये ठेवता येत नाही. या वयात मुलांचे शिक्षण तर पूर्ण झालेले नसतेच, तसेच ती कमवायलाही लागलेली नसतात. राज्यात सुमारे 8क् हजार अनाथ विद्यार्थी आहेत. केवळ अनाथच नव्हे तर एकच पालक हयात असलेली, अपंग किंवा एखादा असाध्य आजार असलेल्या पालकांची मुले, कारागृहात असलेल्या पालकांची मुले यांना या योजनेंतर्गत शिक्षण घेता येणार आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची अभियांत्रिकीची पदविका संपादन करण्याची संधी मिळणार आहे. 
 
4यशस्वी इन्स्टिटय़ूटशी संलग्नित भारत फोर्ज, कमिन्स, टाटा मोटर्स, फियाट, व्होल्टास अशा 17क् कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये 5 तास काम व त्यानंतर 2 तास अभ्यासवर्ग चालणार आहेत. 
4‘ऑन जॉब’ प्रशिक्षणाच्या वेळी विद्याथ्र्याची पुस्तके, गणवेश, जेवण, येणो-जाणो हा खर्च कंपनी करणार असून, विद्याथ्र्याला 6-7 हजार रुपयांचे विद्यावेतनदेखील मिळणार आहे. चार वर्षाच्या ‘ऑन जॉब’ प्रशिक्षणानंतर या विद्याथ्र्याना यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची अभियांत्रिकी, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची पदविका मिळणार आहे. या उपक्रमास महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाची संलग्नता असल्यामुळे हे विद्यार्थी ‘बीई’च्या दुस:या वर्षाला प्रवेश 
घेऊ शकतील.
 
शिक्षण पूर्ण करून कंपनीत नोकरीला लागणा:या विद्याथ्र्याकडून कंपनीला अपेक्षित प्रतिसाद लाभत नाही. त्यांचे ज्ञान आणि प्रत्यक्ष काम यात तफावत असल्याचे कंपन्याच सांगतात. या उलट कंपनीतच काम करता करता शिकल्याने विद्याथ्र्याना अनुभवही मिळतो आणि वेतनही. अशा कौशल्याधारित शिक्षणाची सध्या गरज असून, जगात याच प्रकारे शिक्षण दिले जाते. इथून पुढे अशा प्रकारचे शिक्षण देण्याचा ट्रेंड येणार आहे. सध्या इन्स्टिटय़ूटकडे साडेबारा हजार विद्यार्थी आहेत.
- विश्वेश कुलकर्णी, अध्यक्ष, यशस्वी इन्स्टिटय़ूट
 
4मेकॅनिकल इंजिनियरिंग
4इंडस्ट्रियल इंजिनियरिंग
4इलेक्ट्रॉॅनिक्स व 
कम्युनिकेशन
4इंडस्ट्रियल ड्रग सायन्स
4रिटेल मॅनेजमेंट
4फूड सायन्स
4सप्लाय चेन अँड लॉजिस्टिक मॅनेजमेंट
4हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट

 

Web Title: Engineers will have children in the children's room

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.