शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
2
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
3
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
4
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
5
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
6
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
7
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
8
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान
9
५% व्याजावर ३ लाख रुपयांपर्यंतचं लोन; 'या' लोकांसाठी आहे मोदी सरकारचं मोठं गिफ्ट
10
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
11
कंपन्या जीएसटी रिकव्हरीच्या मुडमध्ये! २२ सप्टेंबरआधीच शाम्पू, साबण २० टक्के डिस्काऊंटवर विकू लागल्या... 
12
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना  हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्या’’, काँग्रेसची मागणी   
13
पत्नीचं अफेअर, पतीला लागली कुणकुण; जळफळाट झाला अन् खुनी खेळ रंगला!
14
सॉवरेन गोल्ड बॉंड गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! ६ वर्षांत १८३% परतावा, RBI ने जाहीर केली मुदतीपूर्वीची किंमत
15
WiFi कनेक्शन बंद केल्याने पोटच्या लेकानेच केली आईची हत्या; वडील म्हणाले, "मुलाला फाशी द्या"
16
"अमेरिका, युरोपमधून इस्लाम संपुष्टात आणणार’’, ट्रम्प समर्थक महिला नेत्याचं वादग्रस्त विधान  
17
आता जेवढा जीएसटी कमी झालाय ना, तेवढ्याला १९८६ मध्ये बुलेट मिळत होती...
18
बोल्ड लूकसह स्मार्ट फीचर्स! होन्डाची पहिली इलेक्ट्रिक बाईक लॉन्च, एका चार्जवर १३० किमी धावणार
19
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
20
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज

अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रम; राज्यात यंदा अंमलबजावणी नाही, बदलांच्या आढाव्यानंतरच ‘पीसीएम’बाबत निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2021 03:08 IST

म्हणूनच यंदाच्या शैक्षणिक वर्षात या निर्णयाची अंमलबजावणी शक्य नसल्याचेही वाघ यांनी स्पष्ट केले. अभियांत्रिकीचे विद्यार्थी हे पदवी, पदविकेसाठी दोन-चार वर्षे नियोजन करून प्रवेश घेतात.

सीमा महांगडे- 

मुंबई : भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) विषय अभियांत्रिकी पदवीसाठी अनिवार्य करायचे की नाही, याबाबतचा निर्णय संबंधित राज्य सरकार, विद्यापीठे किंवा शिक्षण मंडळ यांनी घ्यावा, असे म्हणून अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) त्याची जबाबदारी राज्यांच्या खांद्यावर टाकली आहे. त्यामुळेच या निर्णयाचा तज्ज्ञांमार्फत सखोल अभ्यास करून मगच त्याच्या अंमलबजावणीचा निर्णय घेतला जाईल, असे राज्याचे तंत्रशिक्षण संचालक अभय वाघ यांनी स्पष्ट केले आहे. (Engineering degree courses; No implementation in the state this year, decision on PCM only after review of changes)

    म्हणूनच यंदाच्या शैक्षणिक वर्षात या निर्णयाची अंमलबजावणी शक्य नसल्याचेही वाघ यांनी स्पष्ट केले. अभियांत्रिकीचे विद्यार्थी हे पदवी, पदविकेसाठी दोन-चार वर्षे नियोजन करून प्रवेश घेतात. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या संधीचा निर्णयही योग्य ते नियोजन आणि अभ्यास करून घेणे आवश्यक असल्याचे वाघ यांनी अधोरेखित केले. नवीन शैक्षणिक धोरणानुसार इतर शाखांच्या विद्यार्थ्यांसाठी अभियांत्रिकीची दालने खुली केली असल्याचा दावा एआयसीटीईचे अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे यांनी केला आहे. 

एआयसीटीईच्या निर्णयानंतर डॉ. अभय वाघ यांनी अध्यक्षांशी संवाद साधला. त्या वेळी एआयसीटीईने या निर्णयाच्या अंमलबजावणीची जबाबदारी राज्यांच्या तंत्रशिक्षण संचालनालयाकडे व सरकारकडे सोपविल्याचे एआयसीटीईने स्पष्ट केले. ज्या विद्यार्थ्यांनी गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्राचा अभ्यास करून प्रवेश घेतला आहे त्यांच्यावर अन्याय होऊ नये. तसेच, या निर्णयामु‌ळे कोणत्या अडचणी येऊ शकतील, त्यातून मार्ग कसा काढायचा हे ठरले की मगच मलबजावणीचा निर्णय होऊ शकेल, असेही वाघ यांनी स्पष्ट केले. 

अभियांत्रिकीतील अनेक शाखांसाठी गणित व भौतिकशास्त्र हे विषय पाया आहेत. त्यामुळे हे विषय अभियांत्रिकीतून वगळले, असे म्हणणे चुकीचे ठरेल. मात्र, टेक्स्टाईल इंजिनीअरिंग, बायोटेक्नॉलॉजी, सिरॅमिक्ससारख्या शाखांतील अभ्यासात हे विषय आवश्यक नाहीत. कॉम्प्युटर सायन्ससारख्या विषयांत प्रोग्रॅमिंग भाषा महत्त्वाची असते, अशा शाखांतील शिक्षणासाठी लवचीकता म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्या-त्या राज्यांतील प्रवेश प्रक्रियांसाठी जेईई, सीईटीसारख्या प्रवेश प्रक्रियांचे महत्त्व अबाधित राहणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणिताचे अभियांत्रिकीमधील महत्त्वही कायम राहील. - अनिल सहस्रबुद्धे, अध्यक्ष, एआयसीटीई 

टॅग्स :Studentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयState Governmentराज्य सरकार