बलात्कारप्रकरणी अभियंता अटकेत
By Admin | Updated: February 16, 2015 03:51 IST2015-02-16T03:51:38+5:302015-02-16T03:51:38+5:30
लग्नाचे आमिष दाखवून २५ वर्षीय कॉलेज तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना भांडुपमध्ये शनिवारी समोर आली.

बलात्कारप्रकरणी अभियंता अटकेत
मुंबई : लग्नाचे आमिष दाखवून २५ वर्षीय कॉलेज तरुणीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना भांडुपमध्ये शनिवारी समोर आली. याप्रकरणी सतेंद्र बलदेव मिश्रा (२७) या अभियंत्याला भांडुप पोलिसांनी अटक केली आहे. तो एका नामांकित कंपनीत नोकरीला असून, हनुमाननगरात राहत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
भांडुपच्या फरीद नगरमध्ये तक्रारदार तरुणी आई-वडिलांसोबत राहण्यास आहे. २०१३ मध्ये तिची मिश्रासोबत ओळख झाली. लग्नाचे आमिष दाखवून मिश्राने माथेरान येथील मंदिरात नेऊन तरुणीशी विवाहाचे सोंग रचले. माथेरानमध्ये नेऊन तिच्यावर दोन वेळा बलात्कार केला. मिश्राने फसवणूक करून गावी जाऊन लग्न केल्याची माहिती शनिवारी या तरुणीला मिळाली.