पारसिक बोगद्याजवळ एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड, म.रे. रखडली
By Admin | Updated: July 26, 2016 11:21 IST2016-07-26T10:21:04+5:302016-07-26T11:21:48+5:30
मध्य रेल्वेच्या दिवा ते पारसिक बोगदा दरम्यान सिंहगड एक्स्प्रेसचे इंजिन बंद पडल्याने लोकलसेवा विस्कळीत झाली आहे.

पारसिक बोगद्याजवळ एक्स्प्रेसच्या इंजिनात बिघाड, म.रे. रखडली
>ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. २६ - मध्य रेल्वेच्या दिवा ते पारसिक बोगदा दरम्यान सिंहगड एक्स्प्रेसचे इंजिन बंद पडले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून अप मार्गावरील फास्ट लोकल स्लो ट्रॅकवर वळवण्यात आल्या आहेत. या सर्व गोंधळामुळे मध्य रेल्वेवरील लोकल २०-२५ मिनिटे उशीराने धावत असून ऐन गर्दीच्या वेळेस झालेल्या बिघाडामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. अनेक स्थानकांवर मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळत असून अने प्रवसी ट्रॅकवर उतरून जवळच्या स्टेशनच्या दिशेने चालत जाताना दिसत आहेत.
फोटो : विशाल हळदे