शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
2
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
3
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
4
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
5
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
6
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
7
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
9
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
10
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
11
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
12
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
13
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
14
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
15
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
16
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
17
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
18
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
19
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
20
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर

अनिल देशमुखांचा पाय खोलात; पीए संजीव पलांडे, कुंदन शिंदेंना ईडीकडून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 07:36 IST

ईडीकडून काल अनिल देशमुखांची नऊ तास चौकशी; मध्यरात्रीच्या सुमारास दोन पीएंना अटक

मुंबई: राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. देशमुख यांच्यावर झालेल्या वसुलींच्या आरोपांप्रकरणी काल सक्तवसुली संचलनालयानं (ईडी) त्यांची जवळपास ९ तास चौकशी केली. त्यांचे पीए संजीव पलांडे यांनादेखील ईडीनं चौकशीसाठी बोलावलं होतं. ईडीनं काल मध्यरात्री पीए संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना अटक केली. काल दिवसभरात ईडीनं देशमुख यांच्याशी संबंधित ठिकाणांवर छापेमारी केली. यात त्यांचं नागपूर, मुंबईतील निवासस्थान आणि नागपूरमधील त्यांच्या भागिदारांच्या मालमत्तांचा समावेश आहे.  (Enforcement Directorate Arrested Anil Deshmukh Secretaries Sanjeev Palande And Kundan Shinde)अनिल देशमुख आणि काही इतर व्यक्तींच्या विरोधात ईडीनं गेल्याच महिन्यात मनी लाँड्रिंग कायद्याच्या अंतर्गत एक गुन्हा दाखल केला होता. सीबीआयनं मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशावरून एका गुन्ह्याची नोंद करत सुरुवातीचा तपास केला होता. त्यानंतर ईडीनं गुन्हा नोंदवला. मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझेंना देशमुख यांनी हॉटेल, बार मालकांकडून १०० कोटी रुपये गोळा करण्याचं टार्गेट दिलं होतं, असा गंभीर आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला होता.देशमुखांवरील कारवाई न्यायलयाच्या निर्देशानेच; राऊत राष्ट्रवादीची सुपारी वाजवत असतात; फडणवीसांचा टोला

अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांच्या अटकेनंतर भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्यांनी एक ट्विट केलं. 'वसूली प्रकरणात अनिल देशमुख यांचे सचिव संजीव पलांडे आणि कुंदन शिंदे यांना ईडीनं अटक केली आहे. पुढील काही दिवसांत अनिल देशमुखांनादेखील अटक होईल, असा मला विश्वास वाटतो,' असं सोमय्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.जेव्हा पोलीस आयुक्त पदावर होते, तेव्हा त्यांनी माझ्यावर आरोप का नाही केले; अनिल देशमुखांनी केला सवाल

मी ईडीच्या अधिकाऱ्यांना संपूर्णपणे सहकार्य करत आहे. सत्य समोर येईलच अशी आशा आहे. भविष्यातही मी तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करेन, असं ईडीच्या छापेमारीनंतर अनिल देशमुख म्हणाले. काल सकाळच्या सुमारास ईडीच्या अधिकाऱ्यांनी देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानावर छापा टाकला. तीन तास त्यांनी घराची झडती घेतली. या कारवाईची कल्पना नागपूर पोलिसांना नव्हती. ईडीच्या सुरक्षेसाठी सीआरपीएफचे जवान उपस्थित होते.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय