तलावात कमळाची फुले तोडण्यासाठी उतरलेल्या दोन बहिणींसह भावाचा बुडून अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 04:05 IST2017-09-04T04:04:58+5:302017-09-04T04:05:12+5:30

 The end of the brother's sinking with the two sisters, who came to break the lotus flowers in the lake | तलावात कमळाची फुले तोडण्यासाठी उतरलेल्या दोन बहिणींसह भावाचा बुडून अंत

तलावात कमळाची फुले तोडण्यासाठी उतरलेल्या दोन बहिणींसह भावाचा बुडून अंत

तुमसर (भंडारा) : गावाशेजारील तलावात कमळाची फुले तोडण्यासाठी उतरलेल्या दोन बहिणींसह भावाचा बुडून अंत झाला. रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास सुंदरटोला या आदिवासी बहुल गावात ही हृदयद्रावक घटना घडली. मुस्कान धनराज सरीयाम (९), प्रणय धनराज सरीयाम(१०) व सारिका छबीलाल सरीयाम (११) अशी मृत बालकांची नावे आहेत.
या भावंडांनी काठावर काढून ठेवलेले कपडे दिसल्याने ग्रामस्थांनी तलावात शोधाशोध सुरू केली. अंधार झाल्याने शोधकार्यात अडथळ येत होते. अखेर ८ च्या सुमारास तिघांचे मृतदेह काढण्यात आले असून, उत्तरीय तपासणीसाठी ते तुमसर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत.
मुलगा बुडाला-
धुळ्यातील नकाणेजवळच्या जलतरण तलावात शेख सलमान शेख भिकन (१४) या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास घडली.जामचामळा भागात राहणारे भिकन शेख मजुरी करतात. त्यांचा मुलगा सलमान दुपारी मित्रांसोबत साक्री रोडवरील खासगी जलतरण तलावात गेला होता़ दमछाक झाल्याने तो बुडाला.

Web Title:  The end of the brother's sinking with the two sisters, who came to break the lotus flowers in the lake