रिक्त पदे भरणार - पंकजा मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2016 04:48 IST2016-09-22T04:48:58+5:302016-09-22T04:48:58+5:30

पालघरमधील रिक्त पदे लवकरात लवकर भरली जातील तसेच दर दोन महिन्यांनी या कुपोषणग्रस्त भागाचा दौरा केला जाईल

Empty vacancies - Pankaja Munde | रिक्त पदे भरणार - पंकजा मुंडे

रिक्त पदे भरणार - पंकजा मुंडे

रवींद्र साळवे,

मोखाडा- पालघरमधील रिक्त पदे लवकरात लवकर भरली जातील तसेच दर दोन महिन्यांनी या कुपोषणग्रस्त भागाचा दौरा केला जाईल असेही असे आश्वासन राज्याच्या ग्रामविकास आणि महिला बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी दिले.त्यांनी मोखाडा तालुक्यातील कळमवाडा येथे सागर वाघ आणि खोच येथील ईश्वर सवरा यांच्या पालकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
पालघर कुपोषणाचे बळी ठरलेल्या कुटुंबियांच्या व त्यांच्या भावंडांच्या शिक्षण व पालन पोषणासाठी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने ५१ हजार रुपयांच्या मदतीची घोषणा केली .
आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा आणि आरोग्य मंत्री दिपक सावंत यांनी आज या दौऱ्याला दांडी मारली. मुंडे यांनी दिलेल्या आश्वासने कधी, केव्हा, कशी पूर्ण केली जातील याचा उल्लेख केला नाही. मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने ५१ हजाराची मदत तात्काळ देण्याऐवजी त्यांनी नुसती तिची घोषणा केली.
श्रमजीवीचे नेते विवेक पंडित यांची भेट घेण्याचे मान्य केल्यामुळे श्रमजीवीने या दौऱ्यात कोणतेही शक्ती प्रदर्शन केले नाही.
>कुपोषित राहुलचा मृत्यू
जव्हार/नाशिक : बोपदरी ग्रामपंचायतीतील रुईघर येथील राहुल वाडकर या दोन वर्षांच्या कुपोषित बालकाचा बुधवारी पहाटे नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये मृत्यू झाला. मृत्यूची चौकशी केली जाईल तसेच कुटीर रूग्णालयातील सुविधा वाढविल्या जातील, असे महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title: Empty vacancies - Pankaja Munde