प्रत्येक वॉर्डात रोजगाराच्या शाखा
By Admin | Updated: September 15, 2015 02:07 IST2015-09-15T02:07:25+5:302015-09-15T02:07:25+5:30
महाराष्ट्रातील प्रत्येक वॉर्डात कौशल्य विकास व रोजगाराची शाखा सुरु करण्याचे आदेश भाजपाने आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोमवारी दिले. आतापर्यंत सुशिक्षित सफेद

प्रत्येक वॉर्डात रोजगाराच्या शाखा
मुंबई : महाराष्ट्रातील प्रत्येक वॉर्डात कौशल्य विकास व रोजगाराची शाखा सुरु करण्याचे आदेश भाजपाने आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सोमवारी दिले. आतापर्यंत सुशिक्षित सफेद कॉलर लोकांमध्ये वावर असलेल्या भाजपाने ब्ल्यू कॉलर अर्थात कामगार वर्गात जम बसवण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री थावरचंद गेहलोत यांच्या प्रमुख उपस्थितीत व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची व निवडक कार्यकर्त्यांची सोमवारी बैठक झाली. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कौशल्य विकास कार्यक्रमाची गेहलोत यांनी सविस्तर माहिती दिली.
केंद्र सरकारने मुद्रा बँकेकरिता २० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. परंतु मेकॅनीक, इलेक्ट्रीशियन, मोबाईल रिपेअरिंग अशा वेगवेगळ््या दैनंदिन गरजेच्या कौशल्य विकासात गती असलेल्या युवकांना त्याचे प्रशिक्षण देण्याकरिता प्रत्येक वॉर्डात केंद्र सुरु करायचे आहे.
येथून प्रशिक्षित होणाऱ्यांना आपला छोटा व्यवसाय करण्याकरिता ५० हजार ते १० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज केवळ एक टक्के व्याजाने दिले जाणार आहे. त्या वॉर्डातील लोकांना लागणाऱ्या मेकॅनिक व तंत्रज्ञ पुरवण्याकरिता टोल फ्री क्रमांक दिला जाईल , असे गेहलोत यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)