शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

रोजगार हमी कामावर दिव्यांगांनाही घेणार;वर्षातील किमान १०० दिवस रोजगार देण्याची हमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2020 20:58 IST

राज्य दिव्यांग कल्याण विभागाचा अध्यादेश जारी 

ठळक मुद्देवेगळ्या कामांची निश्चिंती: २१ प्रकारच्या दिव्यांगांना सामावून घेणार

पुणे: महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत आता दिव्यांग व्यक्तींनाही सामावून घेण्यात येणार आहे. तसा अध्यादेशच राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी जारी केला आहे.कोरोना काळात सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे किंबहून त्यांच्यापेक्षा जास्त हाल दिव्यांग व्यक्तींचे झाले. त्यांचा सुरू असलेले रोजगार बुडाला. घरी बसून रहावे लागले. त्यातही शहरी भागातील दिव्यांगांना किमान काही सुविधांमुळे तसेच कुटुंबियांमुळे जगणे सुसह्य होते, ग्रामीण भागातील दिव्यांगांना मात्र हालच सहन करावे लागतात. त्यामुळेच सरकारने त्यांना या योजनेत सामावून घेण्याचा निर्णय घेतला.या रोजगार हमी योजनेत सरकारने वर्षातील किमान १०० दिवस रोजगार देण्याची हमी दिली आहे. त्यासाठी संबधित नागरिकाला त्याच्या कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या रोजगार हमीच्या कामावर जाऊन त्याचे जॉब कार्ड तयार करून घ्यावे लागते. ते केले की त्याला कामावर हजर करून घेतले जाते. आता दिव्यांग व्यक्तींनाही त्यांचे जॉब कार्ड तयार करून घेता येईल. त्यांना कोणती कामे द्यायची ते सरकारने निश्चित केले आहे. तेच काम त्यांना द्यावे असे आदेशात स्पष्टपणे नमुद करण्यात आले आहे. एकूण २१ प्रकारच्या दिव्यांगांना या कामात सामावून घेता येईल. 

टॅग्स :PuneपुणेDivyangदिव्यांगState Governmentराज्य सरकारCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस