तांत्रिक बिगाडामुळे भारतीय वायुदलाच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिग.
By Admin | Updated: October 21, 2015 18:13 IST2015-10-21T18:06:17+5:302015-10-21T18:13:06+5:30
आज दुपारी भारतीय वायुदलाच्या 'एम एमआय-१७' या हेलिकॉप्टरमध्ये प्रशिक्षणादरम्यान तांत्रिक बिगाड झाल्यामुळे बीकेसीच्या सार्वजनिक मैदानावर इमर्जन्सी लँडिग करण्यात आले.

तांत्रिक बिगाडामुळे भारतीय वायुदलाच्या हेलिकॉप्टरचे इमर्जन्सी लँडिग.
ऑनलाईन लोकमत
मुंबई, दि.२१ - आज (बुधवार) दुपारी भारतीय वायुदलाच्या 'एम एमआय-१७' या हेलिकॉप्टरमध्ये प्रशिक्षणादरम्यान तांत्रिक बिगाड झाल्यामुळे बीकेसीच्या सार्वजनिक मैदानावर इमर्जन्सी लँडिग करण्यात आले. यानंतर तेथे बघ्याची मोठी गर्दी झाली नेहमीप्रमाणे, हे हेलिकॉप्टर प्रशिक्षणासाठी आकाशात उडाले. परंतु, यानंतर काही वेळातच तांत्रिक बिघाड आला. यामुळे, चालकाने 'बीकेसी ग्राऊंड' परिसरात हेलिकॉप्टरचे आपात्कालीन 'लँडिंग' केले.या हेलिकॉप्टरमध्ये पाच जवान उपस्थित होते. सुदैवाने, अपघात टळल्याने प्राणहानी किंवा वित्तहानी होण्यापासून वाचली आहे.