महिलांसाठी तातडीने स्वच्छतागृह उभारा !

By Admin | Updated: July 21, 2014 03:39 IST2014-07-21T03:39:45+5:302014-07-21T03:39:45+5:30

राज्यातील शासकीय तसेच खासगी कार्यालयांसह आस्थापना आणि कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह

Emergency building for women immediately! | महिलांसाठी तातडीने स्वच्छतागृह उभारा !

महिलांसाठी तातडीने स्वच्छतागृह उभारा !

नारायण जाधव, ठाणे
राज्यातील शासकीय तसेच खासगी कार्यालयांसह आस्थापना आणि कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्यास यापुढे त्या आस्थापना आणि कारखान्यांच्या परवान्यांचे नूतनीकरण न करण्याचा निर्णय उद्योग व कामगार विभागाने घेतला आहे़ ज्या कार्यालयांमध्ये सध्या महिलांसाठी स्वच्छतागृह नसेल त्यांनी येत्या २४ तासांत तात्पुरत्या स्वरूपात पत्र्याची शेड
टाकून ते उभारावे तसेच भाडेतत्त्वावरील शासकीय कार्यालयात अशी सोय नसेल तर त्यानी मोबाइल टॉयलेटची सोय करावी, असेही शनिवारी तातडीने काढलेल्या आदेशात उद्योग आणि कामगार विभागाचे प्रधान सचिव अरविंद कुमार यांनी म्हटले आहे़
याशिवाय शासनाने केलेल्या तपासणीत यापुढे महिलांसाठी स्वच्छतागृह नसल्यास संबंधित आस्थापना, कारखाना मालकांवर खटले दाखल करून दंडात्मक कारवाई करण्याचा इशाराही आदेशान्वये देण्यात आला आहे़ महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असून शासनाने शासकीय सेवेत महिलांना ३० टक्के आरक्षण दिले आहे़ शासकीय सेवेत महिलांची संख्या
वाढली आहे़ मात्र महिला धोरणानुसार प्रत्येक कार्यालयात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नसल्याची बाब निदर्शनास आल्याने तातडीने हे आदेश काढण्यात
आले आहेत़

Web Title: Emergency building for women immediately!