शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

एल्गार प्रकरण ; एनआयकडे तपास देण्याबाबत उद्या हाेणार सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2020 18:46 IST

एल्गार प्रकरणाचा तपास एनआयकडे देण्याबाबत उद्या सकाळी पुणे सत्र न्यायालयामध्ये सुनावणी हाेणार आहे.

पुणे : एल्गार प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास संस्थेकडे (एनआयकडे) केंद्र सरकारकडून देण्यात आल्याने त्यावर राज्य सरकार आणि आराेपींकडून आक्षेप घेण्यात आला आहे. एल्गार परिषदेच्या तपास प्रकरणाची सर्व कागदपत्रे, पुरावा मुंबईच्या एनआयएच्या विशेष न्यायालयात वर्ग करावीत यासाठी एनआएच्या तपास अधिकाऱ्यांनी पुण्यातील विशेष न्यायालयात अर्ज केला होता. यावर आज सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये आपली बाजू मांडण्यासाठी सरकारी वकीलाने वेळ मागितल्याने यावर उद्या (शुक्रवार) सकाळी 11 वाजता सुनावणी हाेणार आहे. 

केंद्र सरकारने २४ जानेवारी रोजी एल्गार परिषदेचा गुन्हा एनआयएकडे हस्तांतरित केला. त्याला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राज्य शासनाला न कळविता परस्पर गुन्हा हस्तांतरित केल्याने त्याचा निषेध केला होता. 27 जानेवारी रोजी एनआयएचे पथक पुणेपोलिसांकडे येऊन त्यांना गुन्ह्याशी संबंधित कागदपत्रे ताब्यात द्यावीत, म्हणून पत्र दिले होते.  मात्र, राज्य शासनाकडून अथवा पोलीस महासंचालकांकडून काहीही आदेश नसल्याने पुणे पोलिसांनी कागदपत्रे देण्यास नकार दिला होता. त्यानंतर एनआयएने न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यानुसार न्यायालयाने पुणे पोलिसांना आपले म्हणणे मांडण्यास न्यायालयाने सांगितले होते. अजून राज्य शासनाकडून त्याबाबत काहीही माहिती पुणे पोलिसांना दिली नसल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे न्यायालयात पुणे पोलीस तपास वर्ग करायला विरोध करणार की सहमती देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.   

पुण्यातील विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या काेर्टासमाेर ही सुनावणी सुरु आहे. आज झालेल्या सुनावणीत एनआयचे वकील तसेच आराेपींच्या वकीलांनी आपली बाजू मांडली. एनआयएच्या कायद्याचा तसेच केरळ येथील एका केसचा हवाला देत तपासाची कागदपत्रे एनआयकडे देण्याची मागणी एनआयएच्या वकीलांनी केली. त्यावर आराेपींच्या वकीलांनी आक्षेप घेतला. या प्रकरणाची चार्चशिट पुणे सत्र न्यायालयात दाखल झाली असल्याने तसेच राज्य सरकारने तपास पूर्ण केला असल्याने एनआयएकडे हा तपास हस्तांतर करता येणार नाही अशी मांडणी आराेपींच्या वकीलांनी केली. एनआयएच्या वकीलांनी केरळ येथील केसचा दिलेल्या हवाल्याचा अभ्यास करण्यासाठी तसेच आपले म्हणणे मांडण्यासाठी सरकारी वकीलांनी उद्या सकाळी 11 पर्यंतची वेळ वाढवून देण्याची मागणी केली, काेर्टाने ती मान्य केली. 

टॅग्स :Elgar morchaएल्गार मोर्चाPuneपुणेNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाPoliceपोलिस