शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

एल्गार आणि माओवादी संबंध प्रकरण; कागदपत्रे व सुनावणी एनआयए न्यायालयाकडे वर्ग करण्यास मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2020 16:57 IST

पुणे शहर पोलिसांचे तपास आणि मुद्देमालाची कागदपत्रे मुंबई एनआयए विशेष न्यायालयात पाठविण्यासाठी न्यायालयात ना हरकत पत्र

ठळक मुद्देआरोपी आणि जिल्हा सरकारी वकिलांनी सुनावणी वर्ग करण्यास केला होता विरोध

पुणे:राज्य सरकारकडून एल्गार आणि माओवादी संबंध प्रकरणातील गुन्ह्याचा तपास एनआयएकडे देण्यास गुरुवारी मान्यता  देण्यात आली होती. पुणे शहर पोलिसांनी देखील तपास आणि मुद्देमालाची कागदपत्रे मुंबई एनआयए विशेष न्यायालयात पाठविण्यासाठी सुनावणी सुरू असलेल्या न्यायालयात ना हरकत पत्र दिले होते. त्यानंतर विशेष न्यायालयाने देखील मुंंबई येथील राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) न्यायालयात वर्ग करण्यास शुक्रवारी ( दि. १४ ) मंजुरी दिली आहे. त्यामुळे आगामी काळात एल्गार व माओवादी संबंध प्रकरणाची सुनावणी मुंबईत होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.     पुण्यात न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात एल्गार व माओवादी संबंध प्रकरणाची सुनावणी सुरू होती. मात्र, राज्य सरकारकडून या प्रकरणाची नव्याने चौकशीच्या उद्देशाने एसआयटीकडे वर्ग करण्यासंदर्भात हालचाली सुरु केल्या होत्या. मात्र, केंद्राने राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे वर्ग करण्यात आल्याचे जाहीर केले. त्यानंतर राज्य सरकार व ए़नआयए यांच्यात जबाबदारी देण्याविषयी विविध चर्चा घडल्या. त्यानंतर राज्य सरकारने हा तपास एनआयएकडे वर्ग करण्यासाठी मान्यता दिल्याने पुण्यातील विशेष न्यायालय याप्रकरणी काय निर्णय घेणार याकडे लक्ष होते. मात्र न्यायालयाने सुनावणी व कागदपत्रे वर्ग करण्यास परवानगी दिली आहे. आरोपी आणि जिल्हा सरकारी वकिलांनी सुनावणी वर्ग करण्यास विरोध केला होता. मात्र न्यायालयाने त्यांची मागणी फेटाळत एनआयएने केलेला अर्ज मंजूर केला आहे. एनआयए कलम 22 नुसार राज्याला तपासाचे आदेश देण्याचे अधिकार आहेत. तर कलम 11 मध्ये याबाबतचे अधिकार केंद्राला आहेत. एनआयएकडे तपास गेल्याने त्याची सुनावणी घेण्यासाठी पुण्यात देखील न्यायालय आहे. याबाबत गुरुवारी देण्यात आलेले विविध निकालाचे संदर्भ या प्रकरणात लागू होत नाही, असे जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी न्यायालयात सांगितले होते. तर विशेष एनआयएने न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर निर्णय देण्याचे अधिकार सध्या सुनावणी सुरू असलेल्या न्यायालयास नाही, असा युक्तिवाद बचाव पक्षाकडून करण्यात आला होता. न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.  गुन्ह्याचा तपास एनआयएकडे देण्यास राज्य शासनाने गुरुवारी मान्यता दिल्याने पुणे शहर पोलिसांनी तपास आणि मुद्देमालाची कागदपत्रे मुंबई एनआयए विशेष न्यायालयात पाठविण्यासाठी सूनवणी सुरू असलेल्या न्यायालयात ना हरकत पत्र दिले होते.सुनावणी वर्ग झाल्याने आता एनआयए पुन्हा नवीन तपास करणार का? की झालेल्या तपासातून सुटलेल्या मुद्यांवर लक्ष केंद्रित करणार असा प्रश्?न उपस्थित झाला आहे. या प्रकरणातील आरोपींना आणि जप्त केलेला मुद्देमाल 28 फेब्रुवारीला एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर करण्याचे देखील आदेश न्यायालयाने दिले आहे.

टॅग्स :PuneपुणेNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाCourtन्यायालयPoliceपोलिस