शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कामगार कायद्यांतील बदलांविरोधात एल्गार, एप्रिलमध्ये राज्यव्यापी मोर्चा काढण्याचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 03:06 IST

केंद्रीय आणि राज्य पातळीवर सुरू असलेल्या कामगार कायद्यांतील बदलांविरोधात, कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीने दंड थोपटले आहेत.

मुंबई : केंद्रीय आणि राज्य पातळीवर सुरू असलेल्या कामगार कायद्यांतील बदलांविरोधात, कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीने दंड थोपटले आहेत. या बदलांऐवजी कामगारांना अपेक्षित बदल सुचवत, कृती समितीने थेट राज्यपाल विद्यासागर राव यांनाच साकडे घातले आहे. आपल्या मागणीला असलेला पाठिंबा सिद्ध करण्यासाठी कृती समितीने राज्यव्यापी सह्यांची मोहीम आज गुरुवारपासून हाती घेतली आहे.कृती समितीचे अध्यक्ष डॉ. डी. एल. कराड यांनी सांगितले, केंद्रीय स्तरावर कामगारांचे नेतृत्व करणाºया विविध संघटनांच्या कृती समितीची बैठक नुकतीच झाली. त्यात काही मागण्या राज्यपालांकडे करण्यात आल्या आहेत. त्यात कामगारांची संख्या किंवा उद्योगाची अट न ठेवता, प्रत्येक कामगाराला ८ तास कामासाठी दरमहा १८ हजार रुपये किमान वेतन व महागाई निर्देशांकानुसार महागाई भत्ता देण्याची राष्ट्रीय स्तरावर तरतूद करण्याचे आवाहन केले आहे. प्रत्येक कामगाराला रजा, आरोग्य विमा योजना, भविष्य निर्वाह निधी, बोनस देण्याची तरतूद संबंधित कायद्यात करण्याची मागणीही कृती समितीने केली आहे.या मागण्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यात कृती समितीतर्फे १ मार्चपासून बॅनर लावून कामगारांत जनजागृती केली जाईल, तसेच कामगार आस्थापनांबाहेर टेबल टाकून सह्यांची मोहीम घेतली जाईल. या मोहिमेत कामगार व जनतेच्या सह्या घेतल्या जातील. त्यानंतर, एप्रिलमध्ये राज्यव्यापी धडक मोर्चा काढला जाईल.प्रमुख मागण्या --सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कंत्राटी कामगारांना समान कामासाठी समान वेतन देताना कायम व नियमित स्वरूपाच्या कामाचे कंत्राटीकरण करू नका.-कंत्राटी प्रथा निर्मूलनानंतर त्या कामगारांना कायम सेवेत घेण्याची दुरुस्ती कंत्राटी कामगार कायद्यात करा. कंत्राटदार बदलले, तरी त्याच कामगारांना कामाची शाश्वती देण्याची तरतूद करा.-कामगार कपात वा कारखाना बंदी केल्यास, भरपाई म्हणून केलेल्या सेवेच्या प्रती वर्षाला ६० दिवसांचे वेतन व उर्वरित सेवेच्या पूर्ण पगाराइतकी रक्कम द्या.-किमान बोनस एकूण वेतनाच्या १२ टक्के असावा, तसेच बोनसवरील मर्यादा काढून पूर्ण वेतनावर बोनस द्या. ग्रॅच्युईटीची रक्कम प्रती वर्षाच्या सेवेला ३० दिवसांच्या पूर्ण वेतनाएवढी करा. त्यावरील मर्यादा काढून टाका.-असंघटित कामगार कल्याण कायदा २००८ची अंमलबजावणी करा. यंत्रमाग, बिडी, ऊसतोडणी, घरकामगार, बांधकाम अशा एकूण १२२ क्षेत्रांतील कामगारासाठी कल्याण मंडळे स्थापन करा, कल्याणकारी योजनेसाठी बजेटमध्ये तरतूद करा. या मंडळासाठी स्वतंत्र कर्मचारी द्या.