अकरावी प्रवेश प्रक्रियेचे शुल्क झाले कमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 06:02 IST2020-07-31T05:59:51+5:302020-07-31T06:02:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : यंदा अकरावी प्रवेश प्रक्रिया आॅनलाइन राबविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेचे शुल्क २५० हून ...

अकरावी प्रवेश प्रक्रियेचे शुल्क झाले कमी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : यंदा अकरावी प्रवेश प्रक्रिया आॅनलाइन राबविण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेचे शुल्क २५० हून २२५ रुपये केले आहे. यंदा माहिती पुस्तक संकेतस्थळावरून डाउनलोड करता येणार आहे.
या कारणास्तव छापील माहिती पुस्तकांची किंमत या शुल्कातून कमी केल्याची माहिती मुंबई विभागीय उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी दिली.
पीडीएफ स्वरूपातील माहिती पुस्तिकेसाठी मोबाइल अॅप तयार करण्यात येत आहे. मुंबई विभागीय उपसंचालक कार्यालयाकडून अकरावी नोंदणीची प्रक्रिया २६ जुलैपासूनच सुरू झाली असून गुरुवारी रात्री ८ पर्यंत १ लाख ६२ हजार ३५९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती उपसंचालक राजेंद्र अहिरे यांनी दिली. दरम्यान, आता विद्यार्थ्यांना केवळ लॉगइन आयडी आणि पासवर्डच मिळणार असून १ तारखेपासून अर्जा$चा पहिला भाग भरता येणार आहे.
अकरावीसाठी मुंबई विभागात आवश्यक तेवढ्या जागा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांनी काळजी न करता नोंदणी करावी आणि १ आॅगस्टपासून काळजीपूर्वक भाग १ भरून त्यापुढील प्रक्रिया करावी.
- राजेंद्र अहिरे, उपसंचालक , मुंबई विभाग