शहरं
Join us  
Trending Stories
1
भयानक, लक्झरी बसवर दुचाकी आदळली; २० प्रवाशांचा होरपळून मृत्यू, दिवाळी साजरी करून परतत होते
2
ओला-उबरचा बाजार उठणार...! महाराष्ट्रासह 'या' राज्यांत सरकारी 'भारत टॅक्सी' येणार, १०० टक्के भाडे...
3
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
4
कुर्ला, सांगली ते दुबई...मुंबई पोलिसांची धडाकेबाज कारवाई, D-गँगच्या ड्रग्स मास्टरमाइंडला UAE तून खेचून आणले
5
नियतीचा क्रूर खेळ! ६ बहिणींच्या कुटुंबात एकुलता एक मुलगा, भाऊबीजच्या दिवशीच झाला मृत्यू; ऐकून डोळ्यांत पाणी येईल
6
आजचे राशीभविष्य २४ ऑक्टोबर २०२५ : आर्थिक लाभ, खोळंबलेली कामे...
7
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
8
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
9
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
10
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
11
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
12
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
13
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
14
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
16
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
17
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय
18
दिवाळी, छठ पूजेस १०.५ लाख प्रवासी यूपी, बिहारला; मुंबईतून आतापर्यंत १४०० पेक्षा जास्त फेऱ्या
19
कबुतरांसाठी जैन मुनींचे उपोषण; १ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात होणार सुरुवात
20
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री

वीज चोरीचा " लातूर पॅटर्न" पाडला हाणून : महावितरणचे तांत्रिक उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 11:43 IST

महावितरणसाठी डोकेदुखी ठरलेल्या वीजचोरीच्या लातूर पॅटर्न ठरत होता.

ठळक मुद्देरेडिओ फ्रक्वेन्सीच्या मीटरची व्याप्ती वाढविणारही प्रणाली मानवविरहित असून, त्याद्वारे वीज मीटरच्या अचूक  नोंदी एप्रिल- मे महिन्यामध्ये एकूण ३८ ग्राहकांनी मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करण्याचा प्रयत्न

पुणे : महावितरणसाठी डोकेदुखी ठरलेल्या वीजचोरीच्यालातूर पॅटर्नवर महावितरणने रेडिओ फ्रीक्वेन्सी व इन्फ्रारेडच्या अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक मीटरचे उत्तर शोधले आहे. त्या आधारे लातूर शहरातील ३३ ग्राहकांची वीजचोरी पडकण्यात यश आले असून, राज्यात सर्वत्रच असे मीटर बसविण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. त्याची सुरुवात नांदेड, लातूर आणि जळगाव जिल्ह्यातील सर्वाधिक वीज चोरी असलेल्या ठिकाणांहून होणार आहे. राज्यात नांदेड, लातूर व जळगाव या परिमंडलांमध्ये मोठ्या प्रमाणात वीजहानी होते. महावितरण पुरवित असलेल्या विजेच्या तुलनेत येथील ग्राहकांचा वीज वापर कमी होत असल्याचे दिसून आले होते. महावितरणच्या तज्ज्ञांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर लातूरमधील काही भागात आत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक मीटर बसविण्यात आले. त्याद्वारे ही चोरी उघड झाली.  येत्या वर्षभरात नांदेड, लातूर व जळगावशहरत येत्या वर्षभरात सुमारे ८ लाख ५० हजार रेडिओ फ्रिक्वेंसी मीटर बसविण्यात येणार आहेत.  लातूर शहरामध्ये ८८,३३८ एवढे मीटर बसविले जाणार असून, त्यापैकी ६२,२६५ मीटर बसविण्यात आले आहेत. या प्रणालीद्वारे ग्राहकांच्या मीटर रीडिंगची माहिती येण्यास सुरवात झाली असून एप्रिल- मे महिन्यामध्ये एकूण ३८ ग्राहकांनी मीटरमध्ये फेरफार करून वीजचोरी करण्याचा प्रयत्न केला. त्याची माहिती केंद्रीय बिलींग प्रणालीमध्ये दिनांक व वेळेसहित उपलब्ध झाली आहे. या प्रणालीद्वारे लातूर उत्तर व दक्षिण उपविभागातील ३३ ग्राहक वीजचोरी करीत असल्याचे आढळून आले. त्यांनी २४ हजार ९९५ युनिटची वीजचोरी केली असून त्याची अनुमानित रक्कम २ लाख ३७ हजार ३९५ रुपये आहे. तर तडजोड रक्कम १ लाख १८ हजार रुपये आहे. सदर वीजग्राहकांविरूध्द विद्युत अधिनियम-२००३ च्या कलम १३५ नुसार कारवाई करण्यात आली आहे. ग्राहकांनी वीजचोरीच्या वाईट प्रकाराला बळी पडू नये, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात येत आहे.--------------------काय आहे प्रणाली... रेडिओ फ्रिक्वेंसी डेटा कॉन्सेट्रेटर युनिट(डीसीयू) ही प्रणाली मानवविरहित असून, त्याद्वारे वीज मीटरच्या अचूक  नोंदी घेतल्या जातात. त्यामुळे ग्राहकांची वीजबिलांबाबत कोणतीही तक्रार राहणार नाही. या प्रणालीद्वारे दर १५ मिनिटांमध्ये ग्राहक किती विजेचा वापर करतो, ते देखील पाहता येईल. तसेच त्या भागात वीजपुरवठा करणाºया रोहित्रावर त्यावेळी किती वीजभार आहे, याची अचूक माहिती देखील या प्रणालीमुळे मिळणार आहे. रेडिओ फ्रिक्वेंसी डेटा कॉन्सेट्रेटर प्रणालीद्वारे होणाऱ्या मीटर वाचनामुळे एखादा ग्राहक वीजचोरी करीत अल्यास, त्याची माहिती केंद्रीय सर्व्हरमधून मिळते. 

टॅग्स :Puneपुणेmahavitaranमहावितरणtheftचोरीfraudधोकेबाजीlaturलातूर