ओल्या कोळशाचा वीज निर्मितीला फटका!

By Admin | Updated: September 2, 2014 02:00 IST2014-09-02T02:00:17+5:302014-09-02T02:00:17+5:30

चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला ओला व चिकट कोळशाचा पुरवठा होत असल्याने ऊर्जा निर्मिती प्रभावित होत आहे.

Electric charcoal power productions hit! | ओल्या कोळशाचा वीज निर्मितीला फटका!

ओल्या कोळशाचा वीज निर्मितीला फटका!

रवी जवळे - चंद्रपूर
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राला ओला व चिकट कोळशाचा पुरवठा होत असल्याने ऊर्जा निर्मिती प्रभावित होत आहे. एकाही संचातून अपेक्षेएवढी वीज निर्मिती होत नसून 2,34क् मेगाव्ॉट क्षमतेच्या केंद्रातून केवळ 1,3क्8 मेगाव्ॉट वीज निर्मिती होत आहे. परिणामी विजेची समस्या गंभीर झाली आहे.
चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र आशिया खंडातील दुस:या क्रमांकाचा प्रकल्प आहे. मात्र वर्षभरात बोटावर मोजण्याइतक्या दिवशीच क्षमतेएवढी वीज निर्मिती होत असल्याचे चित्र आहे. कधी कन्व्हेअर बेल्ट तुटून एखादा संच बंद असतो तर कधी संच देखभाल दुरुस्तीसाठी बंद ठेवला जातो. घुग्घुस, पदमापूर, दुर्गापूर आदी कोळसा खाणीतून सध्या ओला व चिकट कोळशाचा पुरवठा सुरू आहे. परिणामी त्याची ज्वलन क्षमता कमी होऊन वीज निर्मिती प्रभावित झाली आहे. 
 
तक्रारीनंतरही प्रतिसाद नाही
च्कोळसा खाणीतून ओला व चिकट कोळशाचा पुरवठा होत आहे. प्रशासनाकडे तक्रारी करूनही प्रतिसाद मिळालेला नाही. 
च्पदमापूर, दुर्गापूरसारख्या जवळच्या कोळसा खाणीतूनही मुबलक कोळसा पुरवठा होत नाही, अशी माहिती चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राचे जनसंपर्क अधिकारी व्ही.एम.ढगे यांनी सांगितले. 
 

 

Web Title: Electric charcoal power productions hit!