शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
3
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
4
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
5
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
6
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
7
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
8
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
9
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
10
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
11
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
12
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
13
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
14
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
15
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
16
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
17
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
18
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?
19
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
20
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी

‘एकता विनायक गोखले’च्या निरोपाची हुरहुर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 2:31 AM

मराठी भाषेचा हरवलेला दुवा जोडून एकाकीपणा केला होता दूर

- अपर्णा वेलणकर एकता विनायक गोखले. जन्म १९७९ चा. चाळीस वर्षे ती उत्तर अमेरिकेसह जगातील मराठी माणसांची मैत्रीण होती. महासागर ओलांडून गेलेल्या एकाकी मराठी मनाला आधार द्यायला दुसरे कुणी नव्हते, पुलंचे शब्द नी भीमसेन व कुमारांचे स्वर कानी पडणे दुर्मिळ होते, लाडू, करंज्या आणि आकाशकंदिल नसल्याने परदेशातील दिवाळी उदास होती...अशा इंटरनेटपूर्व काळात कॅनडाच्या टोरोण्टो मध्ये जन्मलेली ही ‘एकता’. तिने दूरदेशी वास्तव्याला गेलेल्या कित्येक मराठी संसारांना सोबत केली, बोला-ऐकायला दुर्मीळ होऊन बसलेल्या मराठी भाषेचा हरवला दुवा जोडून एकाकीपणा दूर केलँ. एकमेकांना फोन करणे परवडत नव्हते, अशा काळात उत्तर अमेरिकेत नव्याने आलेल्या मराठी कुटुंबांची एकमेकांशी गाठ घालून दिली. बदलत्या काळाने दूरदेशी वास्तव्यातील सीमारेषा पार पुसून टाकल्याने आपल्या मैत्रीची जुनी गरज सरली आहे हे लक्षात घेऊन ‘एकता’ने या महिन्यात ‘निरोप’ घेतला.अंकाचे संपादन करणे, त्यासाठी नवनव्या कल्पना काढणे, लेख मागवणे, आवाहने करणे, अंकाची मांडणी करण्यापासून पत्ते चिकटवलेल्या अमेरिकेत पाठवायच्या अंकांच्या थैल्या टोरोण्टोपासून १६0 किमी वरच्या बफेलो पोस्टात नेऊन टाकण्यापर्यंतची सगळी उस्तवार होत गोखलेच करीत.जागतिकीकरणाची लाट येण्याच्या कितीतरी आधी दहा-पंधरा हजार मैलांचे अंतर ओलांडून उत्तर अमेरिकेत गेलेल्या मराठी कुटुंबांच्या प्रवासाचा ‘एकता’ हा एक संपन्न दस्तावेजच आहे. विनायक-प्रतिभा गोखले यांच्यासह अनेकांनी ‘ना नफा’ तत्वावर चालवलेले हे त्रैमासिक यावर्षी पूर्णविराम घेते झाले आहे.आता ‘एकता’चा प्रेमळ बाप निवृत्तीच्या उंबरठ्यावर उभा राहून कृतार्थ निरोप देतो आहे. सध्या गोखल्यांना दृष्टीदोषाने ग्रासले आहे. पण ‘एकता’बद्दल बोलताना त्यांच्या नजरेतले प्रेमाचे लखलखते पाणी अख्ख्या चाळीस वर्षांची कृतार्थ कहाणी सांगते.(उत्तर अमेरिकेतली ‘मराठी’ कहाणी : अग्रलेखाच्या पानावर)कोण आहे एकता विनायक गोखले?हे उत्तर अमेरिकेतून प्रसिद्ध होणारे ‘एकता’ त्रैमासिक! १९६४ साली दूरदेशी गेलेल्या विनायक गोखले यांनी मित्रांसह ‘एकता’ला जन्माला घातले व पोटच्या मुलीसारखे परदेशातल्या पहिल्या मराठी त्रैमासिकाचे लालनपालन केले.एकताचा पहिला अंक निघाला फेब्रुवारी १९७९ मध्ये. पहिला अंक पूर्णत: विनायक गोखले यांच्या अक्षरात होता, कारण मराठी टाइपसेटिंगचे दिवस दूर होते.एकता १९८७ पर्यंत ‘हस्तलिखित’च असे. संगणकयुग सुरू झाल्यावर १९९३ पासून मग हे ‘हस्तलेखन’ संपले.