एकनाथराव खडसे लवकरच मंत्रीमंडळात - डॉ. सुभाष भामरे
By Admin | Updated: July 8, 2017 20:07 IST2017-07-08T18:14:49+5:302017-07-08T20:07:06+5:30
माजी मंत्री एकनाथराव खडसे हे लवकरच मंत्रीमंडळात येतील, असे संकेत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे दिले
एकनाथराव खडसे लवकरच मंत्रीमंडळात - डॉ. सुभाष भामरे
ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि.8 - माजी मंत्री एकनाथराव खडसे हे लवकरच मंत्रीमंडळात येतील, असे संकेत केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे दिले. भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरीतील पिनाका पॉड व पावडर कोटींग या दोन नवीन प्रकल्पांच्या उद्घाटनासाठी ते येत असताना मुक्ताईनगर येथे ते बोलत होते.
भुसावळ ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये हे दोन नवीन प्रकल्प उभारण्यात आले असून त्याचे उद्घाटन डॉ. भामरे यांच्याहस्ते होणार असल्याने त्यांचे मुक्ताईनगर येथे लष्कराच्या हेलिकॉप्टरने आगमन झाले. एकनाथराव खडसे यांनी त्यांचे स्वागत केले. या वेळी खासदार रक्षा खडसे, जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे- खेवलकर, आमदार संजय सावकारे आदी उपस्थित होते. या वेळी बोलताना डॉ. भामरे म्हणाले की, माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे लवकरच मंत्रीमंडळात पुनर्रागमन होईल. यानंतर त्यांनी वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरीला भेट देऊन पाहणी केली.