शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
2
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
3
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
4
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
5
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
6
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
7
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
8
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
9
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
10
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
11
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
12
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
13
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
14
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
15
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
16
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
17
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
18
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
19
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
20
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 

शिंदेंची शिवसेना उद्या पहिली यादी जाहीर करणार; कोण असतील संभाव्य उमेदवार?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2024 1:58 PM

Eknath Shinde will Declare first list of Loksabha Candidate :  लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून सगळेच पक्ष उमेदवारांची यादी जाहीर करत आहेत. त्यात भाजपाने राज्यातील २३ जागांची उमेदवारी यादी जाहीर केली. आणि आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनाही पहिली यादी २६ मार्चला जाहीर करण्याची शक्यता आहे. 

मुंबई - Shivsena First List of LS Candidate ( Marathi News ) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आता सर्वच पक्ष तयारीला लागलेत. त्यात राज्यात महायुतीकडून भाजपाने २३ उमेदवारांच्या २ याद्या जाहीर केल्या आहेत. तर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पहिली यादी उद्या २६ मार्चला घोषित करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिंदेच्या शिवसेनेची पहिली यादी उद्या जाहीर होईल असं संजय मंडलिक यांनी सांगितले आहे. रामटेकमधून राजू पारवे, वाशिम-यवतमाळमधून संजय राठोड यांना उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे. तर मावळमध्ये श्रीरंग बारणे आणि कोल्हापूरातून संजय मंडलिक यांनाच उमेदवारी देण्यात येईल असं बोललं जाते. 

संभाव्य उमेदवार?

रामटेक - राजू पारवेवाशिम-यवतमाळ - संजय राठोडठाणे - प्रताप सरनाईककल्याण डोंबिवली - श्रीकांत शिंदेदक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळेमावळ - श्रीरंग बारणेकोल्हापूर - संजय मंडलिकहातकणंगले - धैर्यशील मानेबुलढाणा - प्रतापराव जाधवशिर्डी - सदाशिव लोखंडे 

हिंगोली, उत्तर पश्चिम मुंबई, पालघर आणि नाशिकच्या जागेवर अद्यापही महायुतीत चर्चा सुरू आहे. नाशिकच्या जागेवरून शिंदे गट आणि भाजपा यांच्यातील संघर्ष तीव्र झाला आहे. नाशिकमध्ये पुन्हा उमेदवारी मिळावी आणि ही जागा शिवसेनेकडेच राहावी यासाठी हेमंत गोडसेंसह शिवसेनेचे पदाधिकारी, नेते यांनी ठाण्यात शक्तिप्रदर्शन केले. 

तर मनसेच्या महायुतीतील चर्चेमुळे दक्षिण मुंबईतील जागेवरही अद्याप कुणाचे नाव पुढे आले नाही. दक्षिण मुंबईची जागा ही शिवसेनेची आहे. याठिकाणी विद्यमान खासदार अरविंद सावंत हे उद्धव ठाकरेंसोबत कायम राहिलेत. त्यात या जागेवर भाजपाचे राहुल नार्वेकर निवडणूक लढवतील असं बोलले गेले. त्यारितीने नार्वेकर प्रचारालाही लागले. परंतु त्याच काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपाचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीनंतर मनसे महायुतीत सहभागी होणार अशी चर्चा सुरू झाली. त्यात दक्षिण मुंबईची जागा मनसेला दिली जाईल असं बोलले गेले. त्यामुळे या जागेवर नेमकं कोण उभं राहते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा