शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेत शिवसेना विरुद्ध शिवसेना 'सामना'?; उद्धव ठाकरेंची नवी खेळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2022 09:23 IST

विधान परिषदेतील शिवसेनेच्या आमदारांची बैठक ९ जुलै रोजी पार पडली. या विरोधी पक्षनेता, गटनेता आणि प्रतोद निवडण्याचे सर्वाधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्याकडे देण्यात आले

मुंबई -  अलीकडेच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेचे २ आमदार निवडून आल्याने परिषदेत त्यांचे संख्याबळ १३ इतके झाले आहे. विरोधी पक्षात काँग्रेस, राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेकडे संख्याबळ जास्त असल्याने आता विधान परिषदेत विरोधी पक्षनेता शिवसेनेचा नेमण्यात यावा याचा ठराव विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे आमदारांनी दिला आहे. 

विधान परिषदेतील शिवसेनेच्या आमदारांची बैठक ९ जुलै रोजी पार पडली. या विरोधी पक्षनेता, गटनेता आणि प्रतोद निवडण्याचे सर्वाधिकार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांच्याकडे देण्यात आले अशी माहिती आमदार सुनील शिंदे यांनी दिली. सध्याच्या आकडेवारीत विधान परिषदेत महाविकास आघाडीत सर्वाधिक संख्याबळ शिवसेनेकडे आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते पदावर दावा करणारे पत्र शिवसेनेच्या आमदारांनी उपसभापतींना दिले आहे. यात आमदार अंबादास दानवे, सचिन आहिर, मनिषा कायंदे, विलास पोतनीस, सुनील शिंदे इत्यादी उपस्थित होते. 

येत्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत सभापती, विरोधी पक्षनेते पदाची निवड होणार आहे. यापूर्वीचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांची ७ जुलै रोजी मुदत संपली. ते विधान परिषदेत पुन्हा निवडून आलेत. मात्र कार्यकाळ संपल्यामुळे परत परिषदेच्या सभागृहात सभापतीपदासाठी निवडणूक होईल. त्यात सत्ताधारी भाजपा-शिंदे गट सभापतीपदासाठीही उमेदवार उतरवणार आहे. विधानसभेत भाजपाचे राहुल नार्वेकर हे अध्यक्षपदी विराजमान झाले. त्यांना १६४ मते मिळाली होती. विधान परिषदेत शिवसेनेचा विरोधी पक्षनेता बनल्यास सभागृहात शिंदे गटाची शिवसेना आणि ठाकरे गटाची शिवसेना आमनेसामने येण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांच्या कारभारावर आक्रमकपणे भाष्य करणाऱ्या आमदाराच्या गळ्यात विरोधी पक्षनेतेपदाची माळ पडू शकते.  “शरद पवार हवेत की शिवसैनिक हे उद्धव ठाकरेंनी ठरवायला हवे”कुटुंब प्रमुखाने मार्ग काढायचा असतो. मुलांनी मार्ग काढायचा नसतो. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडण्याची मागणी आम्ही केली होती. त्यांनी साथ सोडली का? शेवटपर्यंत शरद पवार त्यांना राजीनामा देऊ नका, असे सांगत होते. त्यामुळे उद्धव यांनी शरद पवार हवेत की शिवसैनिक हे ठरवायला हवे. शरद पवार हे त्यांच्यासाठी जवळचे झाले आहेत. आम्ही मात्र, त्यांना दूरचे झालो आहोत असं शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी सांगितले. 

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या कोणत्याही वक्तव्यावर आम्ही बोलणार नाही. आमच्या मित्रपक्षाने देखील त्यांच्यावर भाष्य करू नये. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे असणारा मनाचा मोठेपणा उद्धव यांच्याकडेदेखील आहे. आता, उद्धव यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावे अशी अपेक्षा व्यक्त करताना या संघर्षाचा शेवट गोड होणार असल्याचा दावा केसरकर यांनी केला आहे. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाVidhan Parishadविधान परिषद