शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

'शिवधनुष्य पेलण्याची क्षमता पाहिजे; ते फक्त स्वतःचा विचार करतात'; CM शिंदेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2023 18:31 IST

'येत्या 9 एप्रिलला सर्वांना सोबत घेऊन अयोध्येला जाणार.'

मुंबई: आज छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा आणि भाजप-शिंदे गटाची सावरकर गौरव यात्रा होत आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. 'बाळासाहेबांनी अतिशय विचार करुन शिवधनुष्य उचलले होते. शिवधनुष्य पेलण्यासाठी मोठं मन लागतं, हिंदुत्वाबद्दलचे विचार आणि कार्यकर्त्याच्या पाठिशी उभे राहण्याची वृत्ती लागते. ती बाळासाहेबांच्या अंगात होती. पण, आताचे प्रमुख फक्त स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा विचार करतात. त्यांना कार्यकर्त्याशी काही देणंघेणं नाही,' अशी टीका त्यांनी यावेळी केली.

ते पुढे म्हणाले, 'बाळासाहेबांचे शिवधनुष्य पेलण्यासाठी तशाप्रकारचे विचारही लागतात. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जात आहोत.  शिवजयंतीच्या आदल्या दिवशी आम्हाला शिवधनुष्य मिळालं. यामुळे छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब, आनंद दिघे यांचा आशीर्वाद आमच्या पाठिशी आहे, अशी आमची भावना आहे.'

9 एप्रिलला अयोध्येला जाणारयेत्या '9 तारखेला सर्व आमदार, खासदार, जिल्हाप्रमुख, प्रमुख पदाधिकारी आणि इतर कार्यकर्त्यांसोबत सर्वांना अयोध्येला जाणार आहे. मागे काही नेत्यांना विमानातून उतरावं लागलं होतं, त्यामुळे अनेक नेत्यांची संधी हुकली. आता सगळ्यांना सोबत घेऊन जाणार. शरयू नदीवर आरतीही करणार आहोत. बाळासाहेबांचे आणि देशातील करोडो लोकांचे स्वप्न होते की, राम मंदिर बांधले पाहिजे. हे स्वप्न नरेंद्र मोदींनी पूर्ण केले. कार सेवेत आनंद दिघेंनी चांदीची विट पाठवली होती. त्याप्रमाणे आम्ही सागाचे लाकूड पाठवत आहोत. हा आमचा खारीचा वाटा असेल,' अशी माहिती त्यांनी यावेळी दिली. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा