शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
3
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
4
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
5
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
6
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
7
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
8
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
9
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
10
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
11
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
12
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
13
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
14
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
15
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
16
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
17
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
18
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
19
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
20
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख

शिवसेनेचा मूळ मतदार कुणाकडे? मुख्यमंत्री शिंदेंचा दावा उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढवणारा; थेट आकडेच सांगितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2024 12:02 IST

राज्यातील एकंदरित राजकीय परिस्थितीमध्ये शिवसेनेचा मुळ आधार असलेला मतदार दुरसीकडे गेला नाही. तो आपल्याकडे वळला, धनुष्यबाणाकडे वळला. बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेकडे आला, असा मोठा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

राज्यातील एकंदरित राजकीय परिस्थितीमध्ये शिवसेनेचा मुळ आधार असलेला मतदार दुरसीकडे गेला नाही. तो आपल्याकडे वळला, धनुष्यबाणाकडे वळला. बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेकडे आला, असा मोठा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. एवढेच नाही, तर मूळ शिवसैनिक मतदारांपैकी किती टक्के मतदार आपल्याकडे वळला आणि किती टक्के दुसऱ्या बाजूला गेला याची आकडेवारीही शिंदे यांनी यावेळी मांडली. ते बुधवारी मुंबईमध्ये पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित मेळाव्यात बोलत हेते. यासंदर्भात त्यांनी केलेला दावा भविष्यात उद्धव ठाकरे यांचे टेन्शन वाढवणारा ठरू शकतो, असे बोलले जात आहे.

शिंदे म्हणाले, "या संपूर्ण वावटळीमध्ये (लोकसभा निवडणूक) , या एकंदरित राजकीय परिस्थितीमध्ये शिवसेनेचा जो मुळ आधार आहे, जो मतदार आहे, तो शिफ्ट झाला नाही. तो दुरसीकडे गेला नाही. तो आपल्याकडे वळला, धनुष्यबाणाकडे वळला. याचे उदाहरण म्हणजे, शिवसेनेचे १९ टक्के मतदार होते. बंधू आणि भगिनींनो, शिवसेनेच्या या १९ टक्के मुळ मतदारांपैकी १४.५ टक्के मतदार या आपल्या बाळासाहेबांच्या विचाराच्या शिवसेनेकडे आले आणि ४.५ टक्के मत तिकडे राहिली. हे या निवडणुकीत (लोकसभा निवडणूक) त्यांनाही कळलंय. मग इतर मते कशी आली? कुठून आली? उमेदवार कसे जिंकले? हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. म्हणून, मी एवढंच सांगतो की, ही तात्पुरती आलेली सूज आहे, ती काही दिवसांनी उतरतेही." 

"हा एकनाथ शिंदे जिंकला आणि यापुढेही जिंकत राहील" -"एकनाथ शिंदे संपणार, शिवसेना संपणार, असे काही लोक बरळत होते. मात्र, या राज्यातल्या मतदारांनी त्यांचे दात घशात घातले. हा शिंदे संपला नाही, हा एकनाथ शिंदे जिंकला तुमच्या साथीने. माझ्या या व्यासपीठावरील सहकाऱ्यांच्या आणि महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांच्या साथीने हा एकनाथ शिंदे जिंकला आणि यापुढेही जिंकत राहील, असा इशाराही शिंदे यांनी यावेळी विरोधकांना दिला."

"...ते धाडस एकनाथ शिंदेने करून दाखवलंय" -शिंदे म्हणाले, "अरे हा एकनाथ शिंदे बाळासाहेबांचा सच्चा कार्यकर्ता आहे. धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा चेला आहे. तुमचं आणि या महाराष्ट्रातील जनतेचं प्रेम माझ्यावर आहे. आणि हे प्रेम जोवर माझ्यासोबत आहे. तोवर हा एकनाथ शिंदे कधीही घाबरणार नाही. कधी घाबरला नाही. ज्या प्रकारचं धाडस या देशात कुणी केलं नाही, ते धाडस एकनाथ शिंदेने करून दाखवलंय. यामुळे भीती माझ्या रक्तात नाही. माझ्या शब्दकोशात नाही."

"खरी शिवसेना कोणाची आहे? याचा निकाल जिनतेनेच दिला आहे," -शिंदे म्हणाले, "कोकणात उबाठा साफ, ठाणे, कल्याण, पालघर आणि छत्रपती संभाजीनगरमध्येही उबाठा साफ. मुंबईत चार जागा कशामुळे गेल्या हे आपल्याला सांगण्याची गरज नाही. आपण १३ जागा समोरासमोर लढलो. त्यातील 7 जागा आपण जिंकल्या. यात उबाठाचा स्ट्राईक रेट आहे ४२ टक्के, तर आपला ४७ टक्के आहे. त्यांना १३ जागांवर ६० लाख मते मिळाली, तर आपल्याला ६२ लाख मते मिळाली. आपल्या १५ उमेदवारांना ७४ लाख मते मिळाली. अर्थात सरासरी ४ लाख ९३ हजार मते मिळाली. त्यांच्या २१ उमेदवारांना किती मते मिळाली? तर ४ लाख ५० हजार. म्हणजेच आपण सगळीकडे उबाठापेक्षा सरस आहे. खरी शिवसेना, बाळासाहेबांची शिवसेना, धनुष्यबाणाची शिवसेना आणि तुमच्या सर्वांची शिवसेना सरस ठरली. खरी शिवसेना कोणाची आहे? याचा निकाल जिनतेनेच दिला आहे," असेही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेElectionनिवडणूक 2024Votingमतदान