शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Eknath Shinde: 'धनुष्यबाण एकनाथ शिंदेंकडेच', शहाजीबापूंनी उद्धव ठाकरेंसाठी सूचवलं 'हे' चिन्ह

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 12:41 IST

Eknath Shinde: उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेगट यांच्या धनुष्यबाण चिन्हाच्या लढाईवरुन कायदेशीर सामना सुरू आहे

मुंबई - शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या गटानं बंडाळी करून शिवसेनेला मोठा धक्का दिला. त्यानंतर, राज्यात सत्तापरिवर्तन होऊन एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची सूत्रं स्वीकारली. दरम्यान, राज्यात भाजपच्या मदतीनं सरकार स्थापन झालं. असं असलं तरी हा विषय आता सर्वोच्च न्यायालयाकडे गेला आहे. दुसरीकडे शिवसेना आणि शिवसेनेचं पक्ष चिन्ह असलेल्या धनुष्यबाणासाठी एकानाथ शिंदे यांनी राज्य निवडणूक आयोगाला पत्र लिहिल आहे. त्यावरुन सामना रंगला असताना आता शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील यांनी धनुष्यबाण हा एकनाथ शिंदेंचाच असल्याचं म्हटलं आहे. 

उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शिंदेगट यांच्या धनुष्यबाण चिन्हाच्या लढाईवरुन कायदेशीर सामना सुरू आहे. त्यामुळे, शिवसेना पक्ष कोणाकडे राहणार, आणि शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला मिळणार याची चर्चा होत आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाकडे दोन्ही गटांनी धाव घेतली आहे. याबाबत, स्वत: एकनाथ शिंदेंनीही जाहीर सभेत सांगितलं होतं. आता, शिंदे गटातील आमदार आणि काय झाडी... काय डोंगार... काय हाटील डायलॉगफेम शहाजीबापू पाटील यांनी धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदेंकडेच राहणार असल्याचं म्हटलं आहे. आगामी निवडणुकीत आम्हीच धनुष्यबाणाच्या चिन्हाचे फॉर्म उमेदवारांना देणार. कारण, ते चिन्ह आमच्याच शिवसेनेला मिळेल. उद्धव ठाकरेंनी दुसरं चिन्ह घ्यावं, त्यांनी ढाल-तलवार हे चिन्ह घ्यावे, लढाऊ चिन्हांची काय कमी हाय का, असेही ते म्हणाले. 

शहाजीबापू पाटील यांनी एका वृत्तावाहिनीशी बोलताना आता आमचे नेते एकनाथ शिंदे हेच आहेत. त्यामुळे, यापुढील निवडणुकांवर आमच्याकडून उद्धव ठाकरेंचा फोटो बॅनरवर लावला जाणार नाही, एकनाथ शिंदेंचा लावला जाईल, असे स्पष्टपणे सांगितले. तसेच, आदित्य ठाकरेंच्या सुरू असलेल्या सभा आणि त्यांच्या भाषणावर बोलतानाही त्यांनी आदित्य यांच्यावर टिका केली. आदित्य ठाकरेंनी बाळासाहेबांची कॉपी करू नये, बाळासाहेबांनाच ती ठाकरी भाषा शोभत होती, उद्धव आणि आदित्य ठाकरेंना ती भाषा शोभत नाही, असेही पाटील यांनी म्हटले. 

संजय राऊत दोषी म्हणून अटक

संजय राऊत दोषी असतील म्हणून त्यांना अटक झाली असावी. ईडीचा कुठलाही दोष नाही. त्यांना अटक केली त्यांचा आर्थिक व्यवहार पुढे येतील. आज महाराष्ट्र किरकिऱ्या कारट्याकडून शांत झाला असेल. उद्धव ठाकरेंनी हा आवाज बंद केला नाही तो ईडीने केला. ७-८ वर्ष त्यांचे दर्शन होत नाही आता निवांत राहा. शांत राहा अशा शब्दात शहाजी पाटलांनी राऊतांवर निशाणा साधला आहे.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेनाsangole-acसांगोलाMLAआमदारUddhav Thackerayउद्धव ठाकरे