शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

५ हजार कोटी कथित घोटाळ्यावरून शिंदेसेनेचे मंत्री शिरसाट अडचणीत; चौकशीसाठी सरकारनं नेमली समिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 07:36 IST

बिवलकर कुटुंबाशी संबंधित जमिनीच्या चौकशीसाठी समिती, सिडकोच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर संजय शिरसाट यांनी बिवलकर कुटुंबाला पाच हजार कोटी मूल्य असलेली जमीन वितरित केल्याचा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचा आरोप आहे

मुंबई - बिवलकर कुटुंबाने नवी मुंबईतील पाच हजार कोटी रुपये किमतीची सिडकोची जमीन लाटल्याचा आरोप होत असताना या जमिनीच्या मालकी हक्काच्या निश्चितीबाबत चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने कोकण विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली आहे. या समितीला अहवाल सादर करण्यासाठी दोन महिन्यांची मुदत देण्यात आली आहे.

सिडकोच्या अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर संजय शिरसाट यांनी बिवलकर कुटुंबाला पाच हजार कोटी मूल्य असलेली जमीन वितरित केल्याचा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर चौकशी समितीकडून मौजे दापोली, कोपर, तरघर, सोनखार व उलवेच्या जमिन मालकी निश्चितीची चौकशी केली जाणार आहे. चौकशी समितीत मुख्य वनसंरक्षक ठाणे, जिल्हाधिकारी रायगड, सिडकोचे सहव्यस्थापकीय संचालक -३, उप वनसंरक्षक अलिबाग यांचा समावेश आहे, तर मुख्य भूमी व भूमापन अधिकारी (ठाणे/रायगड), सिडको हे समितीचे सदस्य सचिव आहेत.

केवळ समिती स्थापन करून चालणार नाही, तर निवृत्त न्यायाधीशांच्या देखरेखीखाली स्वतंत्र चौकशी करणे गरजेचे आहे. शिवाय या प्रकरणाचे गांभीर्य बघता आणि समितीची चौकशी प्रभावित होण्याची शक्यता लक्षात घेता मंत्री संजय शिरसाट यांचा राजीनामा घेतलाच गेला पाहिजे. - रोहित पवार, आमदार, शरद पवार गट

English
हिंदी सारांश
Web Title : Shirsat in trouble over alleged 5000 crore scam; probe ordered.

Web Summary : Maharashtra government forms committee to investigate land allocation linked to Minister Shirsat amidst scam allegations. Rohit Pawar demands Shirsat's resignation and judicial oversight.
टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेSanjay Shirsatसंजय शिरसाटRohit Pawarरोहित पवार