शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

बंडखोर आमदार म्हणाले, आमचं चुकलं, ईश्वरानं माफ करावं; राऊतांविरुद्ध मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 1:55 PM

संजय राऊतांनी गुवाहाटीला येऊच नये ही कळकळीची विनंती. मी संयमाने बोलतोय. बाळासाहेब ठाकरे असते तर हाकलून लावलं असतं असं केसरकरांनी सांगितले आहे.

गुवाहाटी - विधान परिषदेच्या निकालानंतर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेत उभी फूट पडल्याचं चित्र दिसून येत आहे. शिंदे याच्यासोबत शिवसेनेचे ३९ आमदारांसह १२ अपक्ष आमदार आहेत. या आमदारांविरोधात सातत्याने शिवसेनेचे नेते संजय राऊत जहरी टीका करताना दिसत आहेत. बंडखोर आमदारांचे अनेक बाप आहेत, आमचा बाप एकच आहे असं राऊतांनी म्हटलं होतं. 

संजय राऊतांच्या विधानावर बंडखोर आमदार संतप्त झाले आहेत. याबाबत शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी बंडखोर आमदारांच्या भावना माध्यमांसमोर मांडल्या. केसरकर यांनी सांगितले की, संजय राऊत यांच्यावर बंडखोर आमदार संतप्त आहे. या लोकांची मते घेऊन राज्यसभेत गेला. थोडीशी  शिल्लक असेल तर राजीनामा द्या, तुमचे राष्ट्रवादीत हितचिंतक आहेत त्यांची मते घेऊन राज्यसभेत जा. संजय राऊतांना मतदान करून आम्ही चुकलो, आमच्या चुकीबद्दल ईश्वराची माफी मागतो. आमच्याकडून मते मिळाली त्यांनी राजीनामा द्यावा. राऊतांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर खासदार व्हावं. ते अर्धावेळ राष्ट्रवादीचे प्रवक्ते म्हणून काम करतात. आमच्याबद्दल बोलू नये. असा प्रवक्ता कुठल्याही पक्षाला देऊ नये अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. 

तसेच संजय राऊतांनी गुवाहाटीला येऊच नये ही कळकळीची विनंती. मी संयमाने बोलतोय. बाळासाहेब ठाकरे असते तर हाकलून लावलं असतं. बाळासाहेब असते बंडखोरी झालीच नसती. त्यांनी मायेने पाठिवर थाप फिरवून म्हणणं ऐकून घेतलं असते. संजय राऊतांचे ईडीचे प्रकरण जुनेच आहे. राऊतांचे टायमिंगही चुकीचं असते. कालपर्यंत आम्हाला मृत झालेले आहेत बोलतात. संजय राऊतांचे टायमिंग चुकतं. सकाळी ९ पत्रकार परिषद करून ईडीच्या प्रश्नांना सौम्य भाषेत उत्तर द्यावीत असा टोला दीपक केसरकर यांनी राऊतांना लगावला. 

विजय सत्याचा होईल - केसरकरएकनाथ शिंदे हेच आमचे नेते असून आम्हीच शिवसेना आहोत. अजय चौधरी यांची नेमणूक अवैध आहेत. विधानसभा उपाध्यक्षांनी जी नोटीस दिली आहे ती बेकायदेशीर आहे. १४-१५ जणांना घेऊन नवी निवड केली ती बेकायदेशीर आहे. जोपर्यंत आम्हाला ही मान्यता मिळत नाही तोवर पक्षाविरोधात काही कृती केली असं करणार नाही. अंतिम विजय सत्याचा होईल असंही केसरकर यांनी म्हटलं. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदेSanjay Rautसंजय राऊत