शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
4
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
5
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
8
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
9
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
10
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
11
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
12
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
13
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
14
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
15
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
17
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
18
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
19
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
20
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर

Eknath Shinde: ४२ आमदारांसह एकनाथ शिंदेंचं जोरदार शक्तीप्रदर्शन; पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 14:27 IST

महाविकास आघाडी सरकारविरोधात या आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

गुवाहाटी - मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे अपक्ष मिळून ४२ आमदार शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे केवळ १८ आमदार असल्याचं कळतंय. गुवाहाटीच्या हॉटेलमधून एकनाथ शिंदे यांनी आमदारांचे शक्तीप्रदर्शन केले. यावेळी मोठ्या प्रमाणात बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने घोषणा दिली जात होती. शिंदे गटात सहभागी असलेले आमदार उद्धव ठाकरेंवर नाराज असल्याचं प्रखरतेने दिसून येते. 

या आमदारांचा व्हिडिओ पाहिला तर कुठल्याही आमदाराला बळजबरीने डांबून ठेवल्याचं दिसत नाही. महाविकास आघाडी सरकारविरोधात या आमदारांनी नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नको अशीच भूमिका शिवसेनेच्या या आमदारांची आहे. दुसरीकडे बंडखोर आमदारांमध्ये आणखी काही आमदार सहभागी होणार असल्याचं पुढे येत आहे. एकनाथ शिंदे गटाने विधानसभेच्या उपाध्यक्षांना पत्र पाठवून आम्हीच खरी शिवसेना आहोत असं म्हटलं आहे. तर गटनेतेपदी उपाध्यक्ष नाना झिरवाळ यांनी अजय चौधरी यांच्या नेमणुकीला मान्यता दिली आहे. 

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीची कल्पना आधीच होतीएकनाथ शिंदे सहा महिन्यापासून बंडखोरी करण्याच्या तयारीत असल्याचं समोर आले. इतकेच नाही उद्धव ठाकरे यांना ५-६ वेळा गृहमंत्रालयाकडून शिंदे यांच्या हालचालीची माहिती देण्यात आली होती. परंतु इंटेलिजन्सचा रिपोर्ट मिळूनही उद्धव ठाकरे यांनी दुर्लक्ष केल्याने शिवसेनेवर ही परिस्थिती आल्याचं सांगितले जात आहे. गुप्तचर विभागाने महाराष्ट्रातील राजकीय संकटाची कल्पना २ महिन्यापूर्वीच सरकारला दिली होती. परंतु कुठलीही कारवाई झाली नाही असा दावा पोलीस सूत्रांनी केला आहे. २ महिन्यापूर्वीच एकनाथ शिंदे यांच्यासह ८ ते १० आमदार विरोधी पक्षाच्या संपर्कात असल्याची माहिती देण्यात आली होती. 

वर्षाची दार आमच्यासाठी बंद होतीकाल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली. बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद झाला. ही दारं गेली अडीच वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी बंद होती. आमदार म्हणून बंगल्यात प्रवेश करण्यासाठी, आम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या, लोकांमधून निवडून न येणाऱ्या, विधान परिषद आणि राज्यसभेत आमच्या जीवावर जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती. हेच so called (चाणक्य कारकून) बडवे आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची रणनिती ठरवत होते. त्याचा निकाल काय लागला ते अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे अशा शब्दात बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र लिहिलं.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना