अपात्रतेचा निकाल येण्यापूर्वीच एकनाथ शिंदेंनी पुढचा गिअर टाकला; संपर्क नेते, लोकसभा निरीक्षक नियुक्त्या जाहीर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 15:02 IST2023-12-05T15:01:17+5:302023-12-05T15:02:36+5:30
शिंदे यांनी शिवसेनेचे राज्यातील संपर्क नेते आणि लोकसभा निरीक्षक नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.

अपात्रतेचा निकाल येण्यापूर्वीच एकनाथ शिंदेंनी पुढचा गिअर टाकला; संपर्क नेते, लोकसभा निरीक्षक नियुक्त्या जाहीर
डिसेंबर महिन्याअखेरीस विधानसभा अध्यक्षांकडून आमदार अपात्र प्रकरणावर निकाल येणार आहे. यामुळे राज्यातील वातावरण तापलेले आहे. असे असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी पुढचा गिअर टाकला आहे. शिंदे यांनी शिवसेनेचे राज्यातील संपर्क नेते आणि लोकसभा निरीक्षक नियुक्त्या जाहीर केल्या आहेत.
शिंदे यांनी कोकण पट्टा, पश्चिम महाराष्ट्र वगळून उर्वरित ११ क्षेत्रांसाठी लोकसभा निरीक्षकांच्या नियुक्त्या केल्या आहेत. यानुसार राजेश पाटील -नंदुरबार, प्रसाद ढोमसे - धुळे, सुनील चौधरी - जळगाव, विजय देशमुख - रावेर, अशोक शिंदे - बुलढाणा, भूपेंद्र कवळी - अकोला, मनोज हिरवे - अमरावती, परमेश्वर कदम - वर्धा, अरुण जगताप - रामटेक, अनिल पडवळ - नागपूर, आशिष देसाई - भंडारा-गोंदिया यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे.
तर पश्चिम महाराष्ट्र सोडून कोकण पट्ट्यासह उर्वरित महाराष्ट्रासाठी विभागीय संपर्क नेत्यांचीही निय़ुक्ती करण्यात आली आहे. कोकण विभाग रायगड, रत्नागिरी, सिंधूदुर्ग जिल्ह्यांसाठी उदय सामंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोकण विभाग ठाणे, पालघरसाठी नरेश म्हस्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई विभाग मुंबई शहर, मुंबई उपनगरसाठी सिद्धेश कदम, किरण पावसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तर मराठवाडा विभाग नांदेड, लातूर, हिंगोली, धाराशिवसाठी आनंदराव जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मराठवाडा विभाग जालना, संभाजीनगर, परभणी, बीडसाठी अर्जुन खोतकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्र विभाग नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार, नगर जिल्ह्यांसाठी भाऊसाहेब चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.