शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

Fire Incident: नाशिक, विरारच्या दुर्घटनेनंतर राज्य सरकारला जाग; सर्व रुग्णालयातील फायर, स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2021 7:59 PM

Fire Incident: एमएमआर रीजनमधील सर्व महानगरपालिकाच्या अखत्यारीतील सरकारी आणि खाजगी रुग्णालयांचे फायर, स्ट्रक्चरल आणि ऑक्सिजन ऑडिट करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

ठाणे: एमएमआर रीजनमधील सर्व महानगरपालिकाच्या अखत्यारीतील सरकारी आणि खाजगी रुग्णालयांचे फायर, स्ट्रक्चरल आणि ऑक्सिजन ऑडिट करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (मंगळवारी) दिले. सध्या वाढत असलेल्या आगीच्या घटना टाळण्यासाठी हे ऑडिट त्रयस्थ तज्ञ संस्थेच्या माध्यमातून करण्याचे आदेश त्यांनी सर्व महानगरपालिकांच्या आयुक्तांना दिले. 

एमएमआर रीजनमधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नगरविकास मंत्र्यांच्या उपस्थितीत व्हीसीद्वारे आज बैठक पार पडली. यावेळी ठाणे,रायगड, पालघर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. यावेळी ऑक्सिजन, रेमडेसिवीर उपलब्धतेचा आढावा घेण्यात आला. त्यासोबतच होम आयसोलेशनमध्ये असलेल्या पेशंट्सची विचारपूस करण्यासाठी आणि त्यांच्या तब्येतीची माहिती मिळवण्यासाठी कॉल सेंटरचा प्रभावी वापर करण्याची सूचना शिंदे यांनी केली. 

नागपूर जायचेय आठ हजार द्या... चंद्रपूर जायचे असेल तर १२ हजार मोजा !

उन्हाळा सुरू झाल्याने एसी आणि व्हेंटिलेटर यांमुळे अतिरिक्त वीज वापरली जाते. त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन आगी लागण्याची शक्यता असल्याने कोविड केअर सेंटरच्या ठिकाणी फायर ब्रिगेड तैनात करण्याच्या सूचना शिंदे यांनी केली. यासोबतच अनेकदा रात्री अपरात्री खाजगी रुग्णालयातील ऑक्सिजन संपल्याच्या घटना वारंवार घडत होत्या. या घटना टाळण्यासाठी सहाययक आयुक्त आणि वॉर्ड ऑफिसर यांच्या मदतीने या ऑक्सिजन पुरवठ्यावर लक्ष ठेवणे आणि ऑक्सिजन कमी होताच पालिकेला कळवणे बंधनकारक करण्याची सूचनाही त्यांनी केली. तसेच कोविड केअर सेंटर मधील महिला रुग्णांसोबत कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी दक्ष राहण्याचे आदेश देखील शिंदे यांनी दिलेत. 

लसीकरणात महाराष्ट्राने रोवला मैलाचा दगड दीड कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण

एमएमआर रीजन मधील काही महानगरपालिकांच्या भागातील करोना रुग्णाची संख्या घटत असल्याचे निरीक्षण काही महापालिका आयुक्तांनी नोंदवले.मात्र तरीही ऑक्सिजन जनरेशन प्लांटचे काम शक्य तेवढ्या लवकर पूर्ण करून हे प्लांट कार्यान्वित करण्याचे निर्देश देखील नगरविकास मंत्र्यांनी सर्व आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना  दिले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसEknath Shindeएकनाथ शिंदेhospitalहॉस्पिटलfireआगState Governmentराज्य सरकार