शहरं
Join us  
Trending Stories
1
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
2
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
3
आजचे राशीभविष्य,०४ नोव्हेंबर २०२५: वडीलधाऱ्यांकडून लाभ, दुपार नंतर प्रतिकूलतेशी तोंड द्यावे लागेल
4
ठाण्यातील दोस्ती कम्पाउंडमधील ८ इमारतींचे पाडकाम सुरू; दीड हजार रहिवाशांचा आक्रोश
5
इंडिया मेरिटाईम वीक-२०२५: ‘जेएनपीए’चे जागतिक स्तरावरील १९ कंपन्यांशी २ लाख काेटींचे करार
6
पाळीव प्राण्यांना सन्मानाने ‘शेवटचा निरोप’; विशेष अंत्यविधी केंद्रांच्या उभारणीलाही सुरुवात
7
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...
8
अलिबाग-रोहा मार्गावर पूल कोसळला; वाहतूक पूर्ण ठप्प; राेजच्या प्रवाशांचे हाल
9
मुंब्रा दुर्घटना: रेल्वेच्या २ अभियंत्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा; ४ महिन्यांनंतर कारवाई
10
रोहित आर्याप्रकरणी अहवाल सादर करा! मानवाधिकार आयोगाकडून पोलिसांना ८ आठवड्यांची मुदत
11
छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट
12
मतदारांची दुबार नावे शोधा, त्यांचे दुबार मतदान रोखा! निवडणूक आयोगाने दिले स्पष्ट आदेश
13
STचा पुढचा पल्ला वीजनिर्मितीचा; सौरऊर्जा प्रकल्पातून वर्षाला ३०० मेगावॅट निर्मितीचे लक्ष्य
14
मुंबई अपहरण प्रकरण: रोहित आर्याचे एन्काउंटर; माजी मंत्री केसरकर यांची हाेणार चौकशी
15
मुख्य अधिष्ठाता डॉ. बारोट यांची उचलबांगडी; हलगर्जी भोवली, वैद्यकीय अधिकाऱ्याला कारणे दाखवा
16
आवडत्या बांधकाम व्यावसायिकांसाठी ५ हजार कोटींचा पीएपी घोटाळा: वर्षा गायकवाड
17
डॉक्टर संपाचा रुग्णसेवेवर परिणाम नाही; राज्यभर ओपीडीत रुग्णांची नेहमीप्रमाणेच तपासणी
18
ऊस दरासाठी बोलावलेली पहिली बैठक निष्फळ; आम्ही कायदा हातात घेऊन कारखाने बंद पाडू; राजू शेट्टींचा इशारा
19
रशियाच्या मदतीने इराण ८ नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधणार, असा करार दोन्ही देशांमध्ये झाला
20
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या

Eknath Shinde: शिवसेना आमदारांची बैठक संपली; ५५ पैकी केवळ १८ आमदार उपस्थित, पाहा यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2022 14:47 IST

विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले. त्यांच्यासोबत पक्षाचे अन्य आमदारांचे फोनही बंद झाले.

मुंबई - राज्यात विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर मोठी राजकीय घडामोड घडली आहे. शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसोबत बंड पुकारल्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या स्थिरतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वर्षा निवासस्थानी शिवसेनेच्या आमदारांची बैठक पार पडली. या बैठकीत विधानसभेचे १८ आमदार उपस्थित होते. मात्र राज्यात घडणाऱ्या घडामोडीवर शरद पवारांनी हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचं म्हटलं आहे. 

विधान परिषदेची निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल झाले. त्यांच्यासोबत पक्षाचे अन्य आमदारांचे फोनही बंद झाले. त्यामुळे शिवसेना नेतृत्वाची चिंता वाढली. त्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांना मुंबईत बैठकीसाठी बोलावलं. वर्षा बंगल्यावर दुपारी १२ वाजता ही बैठक होणार होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी उपस्थित आमदारांना मार्गदर्शन केले. परंतु या बैठकीत केवळ १८ विधानसभेचे आमदार उपस्थित असल्याने शिवसेनेला किती मोठा फटका बसला आहे याचा अंदाज येऊ शकतो. परंतु काही आमदार ऑन दे वे असल्याचं पक्षातील नेत्यांनी दावा केला. 

बैठकीला कोण कोण उपस्थित होते?वैभव नाईक, उदयसिंह राजपूत, नरेंद्र दराडे, रवींद्र वायकर, मंगेश कुडाळकर, राहुल पाटील, उदय सामंत, प्रकाश फातर्पेकर, दिलीप लांडे, गुलाबराव पाटील, दादा भूसे, संजय पोतनीस, संतोष बांगर, सुनील प्रभू, राजन साळवी, आदित्य ठाकरे, अजय चौधरी, सदा सरवणकर या आमदारांनी हजेरी लावली. 

बैठकीत काय घडलं?  या बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले की, आपल्या सरकारला काहीही धोका नाही. जे नाराज आहेत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. तुम्ही आणि आपण बाळासाहेबांचे शिवसैनिक, भगव्याचे रक्षक आहोत. आपल्याला एकत्र राहायचं आहे असा विश्वास त्यांनी आमदारांना दिला. मुंबईत सेंट रेजीस हॉटेलमध्ये शिवसेनेच्या आमदारांना ठेवण्यात आले आहे. त्या आमदारांसोबत शाखाप्रमुख, विभागप्रमुख आणि गटप्रमुख ही साखळी ठेवण्यात आली आहे. तुर्तास या आमदारांमध्ये कुठली फोडाफोड होऊ नये यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. सरकारला धोका नाही - शरद पवारदिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार म्हणाले की, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रिपद हवं की नाही हे माहिती नाही. मुख्यमंत्रिपद हे शिवसेनेकडे आहे. त्यामुळे तेच यावर भूमिका घेऊ शकतात. शिवसेनेची बैठक संपल्यानंतर उद्धव ठाकरे जे भूमिका घेतील त्यावर आम्ही चर्चा करून निर्णय घेऊ. विधान परिषदेत क्रॉस व्होटिंग झाल्यानंतरही सरकार चालतं हा माझा ५० वर्षाचा राजकीय अनुभव आहे असं त्यांनी सांगितले आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे