मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर शुक्रवारी एक छोटी शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. यासाठी त्यांना रुग्णालयात दाखलदेखील करण्यात आलंय. परंतु यानंतर मुख्यमंत्रिपदाची धुरा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्यात येणार असल्याचं वृत्त सोशल मीडियावर व्हायरल होत होतं. परंतु हे वृत्त निराधार असून एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाकडून या वृत्ताचं खंडन करण्यात आलं आहे.
'मुख्यमंत्रिपदाचा तात्पुरता कार्यभार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आल्याचे वृत्त सोशल मीडियावरून व्हायरल होत असून त्यात कुठलेही तथ्य नाही. मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांच्यावर एक छोटीशी शस्त्रक्रिया करण्यात येणार असून, त्यानंतर अवघे तीन ते चार दिवस आराम केल्यानंतर ते पुन्हा जनतेच्या सेवेत रुजू होतील. त्यामुळे समाजमाध्यमावर फिरणाऱ्या खोट्या आणि खोडसाळ मेसेजस, पोस्टवर विश्वास ठेवू नये,' असं आवाहन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयाकडून करण्यात आलं आहे.