शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

"बाळासाहेब जिवंत असते तर, xxxx घरी बसा म्हटलं असतं"; शहाजीबापूंचा जोरदार टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 14:59 IST

मी शिवसेनेचा आमदार आहे. मी धनुष्यबाणावर निवडून आलोय. मला लक्ष्य करून पाडणार, माझ्या एवढे पडायचं प्रॅक्टिस महाराष्ट्रात कुणाकडं नाही असा सांगोल्याचे शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं.

पुणे - एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा दसरा मेळावा व्हावा. कारण बाळासाहेबांच्या विचारधारेशी प्रामाणिक राहून शिवसेना काम करतेय. उद्धव ठाकरेंनी हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार जोपासले असते तर काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी घडली असती का? बाळासाहेब ठाकरे जिवंत असते तर युती झाली असती का? तुम्हीच सांगा, फिरकू सुद्धा दिलं नसतं.  xxxx घरी बसा म्हटलं, कशाला चाललाय त्या काँग्रेस-राष्ट्रवादीकडं असं म्हटलं असतं अशा शब्दात सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला. 

शहाजी पाटील म्हणाले की, बाळासाहेब ठाकरेंची विचारधारा खूप मोठी होती. हिंदुत्ववादी विचारांचा पाया अडीच वर्षापूर्वी उद्ध्वस्त झाला आणि अडचणी निर्माण झाल्या. मतदारसंघात, वैचारिक पातळीवर लोकांना उत्तर देणे आम्हाला मुश्किल व्हायला लागलं. तुम्ही शिव्या देत होतो काँग्रेस-राष्ट्रवादीला मग त्यांच्यासोबत कसं गेला? असा प्रश्न जनता विचारू लागली. ज्यांची सत्ता अचानक रातोरात गेल्या ते भ्रमिष्ट झालेत. वैतागलेले आहेत असा टोला त्यांनी लगावला. 

त्याचसोबत गद्दार, खोकी काढतायेत. आम्हाला डाळिंबाची पेटी भरणारी खोकी माहित्येत. ज्यांची संस्कृती राजकारणात खोक्यांवर अवलंबून आहे. अशी मनोवृत्तीच खोक्याचे बोलतात. ५० आमदार फुटले, आम्ही राजकारण करतो, ग्रामपंचायतीचा सदस्य फोडतानाही घाम फुटतो. इथे ५० आमदार फुटू शकतात. सगळ्यांच्या मनात जे होते ते घडलेले आहे असं शहाजीबापू पाटलांनी म्हटलं. 

उद्धव-आदित्य ठाकरेंना २ बंगले घेऊन देतो....दरम्यान, मी शिवसेनेचा आमदार आहे. मी धनुष्यबाणावर निवडून आलोय. मला लक्ष्य करून पाडणार, माझ्या एवढे पडायचं प्रॅक्टिस महाराष्ट्रात कुणाकडं नाही. ७-८ वेळा पडलोय. राजकारणात याची पर्वा करत नाही. पडलो तरी पुढे चालायचं असतं. लक्ष्य चांगले करावे. मी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना २ बंगले भाड्याने देऊन ठेवतो. तिथे राहावं. लोकांची कामे करावी असा चिमटाही शहाजी पाटलांनी काढला. 

लक्ष्मण विचित्र पात्रज्यानं २ वेळा आमदारकी लढवली त्याला २७० मते पडली. लक्ष्मण हाके माझा दोस्त असला तरी विचित्र पात्र आहे. ते पात्र लक्ष देण्यासारखं नाही. माझ्याकडं येणार धनगरांची मते मला पडतील. गणपतरावांकडं जाणार नाहीत असं म्हणतो. गणपतरावांकडं जातो त्यांना सांगतो बापूंना धनगरांची मते पडणार नाही म्हणून मी उभा राहतो असं हे पात्र आहे असा घणाघात लक्ष्मण हाकेंवर करण्यात आला. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAaditya Thackerayआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे