शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

सीबीआयला राज्यात तपासाचे दरवाजे खुले; महाविकास आघाडीचा निर्णय शिंदे सरकारने फिरवला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2022 10:26 IST

चार महिन्यांपूर्वी राज्यात सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीचा आणखी एक निर्णय बदलला आहे.

मुंबई: राज्यात सीबीआयला कोणत्याही प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आता राज्य सरकारच्या परवानगीची आवश्यकता लागणार नाही. हा निर्णय घेऊन चार महिन्यांपूर्वी राज्यात सत्तेवर आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने महाविकास आघाडीचा आणखी एक निर्णय बदलला आहे.

पूर्वीही राज्य सरकारच्या परवानगीशिवाय सीबीआय एखाद्या प्रकरणाचा थेट तपास करू शकत होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने २१ ऑक्टोबर २०२१ रोजी एक निर्णय घेऊन सीबीआयला राज्य सरकारची परवानगी बंधनकारक केली होती. 

राज्यात कोणत्याही प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारच्या परवानगी आवश्यकता असेल, असा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. मात्र शिंदे फडणवीस सरकारने महाविकास आघाडी सरकारचा हा निर्णय बदलला आहे.

परवानगीचे घातले होते बंधन१. महाविकास आघाडी सरकार असताना सीबीआयने अनेक १. प्रकरणात राज्यात थेट तपास सुरु केला होता. त्यामुळे केंद्रीय संस्थांचा गैरवापर सुरू असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यावेळी केला होता.२. यातील अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणावरून मुंबई पोलीस आणि सीबीआयमध्ये तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर सीबीआयचा हा थेट तपासाचा अधिकार काढून घेण्याचे महाविकास आघाडी सरकारने ठरवले.३. अनिल देशमुख गृहमंत्री असताना गृहविभागाने सीबीआयला राज्य सरकारची परवानगी बंधनकारक करणारा प्रस्ताव तयार केला. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी त्याला २१ ऑक्टोबर २०२१ रोजी मंजुरी दिली होती.

- २०१४ साली केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर देशातील: ज्या राज्यात भाजपची सत्ता नाही अशा महाराष्ट्रासह नऊ राज्यांनी सीबीआयला राज्य सरकारची परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. सत्ताबदल झाल्यानंतर निर्णय फिरवला आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेCBIगुन्हा अन्वेषण विभाग