Dahi Handi Sports Eknath Shinde: दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यामागे शिंदे-फडणवीस सरकारचं नक्की काय आहे राज'कारण'... समजून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2022 04:42 PM2022-08-21T16:42:56+5:302022-08-21T16:43:37+5:30

शिंदेंचा हा निर्णय मास्टरस्ट्रोक असून ठाकरे गटाचं टेन्शन वाढवणारा असल्याचं राजकीय विश्लेषकांचे मत

Eknath Shinde Government master plan to declare Dahi Handi adventure sports setback to Uddhav Thackeray Shiv Sena | Dahi Handi Sports Eknath Shinde: दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यामागे शिंदे-फडणवीस सरकारचं नक्की काय आहे राज'कारण'... समजून घ्या

Dahi Handi Sports Eknath Shinde: दहीहंडीला खेळाचा दर्जा देण्यामागे शिंदे-फडणवीस सरकारचं नक्की काय आहे राज'कारण'... समजून घ्या

googlenewsNext

Dahi Handi Sports, Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकताच दहीहंडीला साहसी खेळाचा चर्जा देण्याबाबत घोषणा केली. इतकेच नव्हे तर इतर खेळांप्रमाणेच या खेळातील गोविंदांना सरकारी नोकरीमध्ये कोटा मिळणार असल्याची घोषणा केली. पण दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा देण्याच्या शिंदे यांच्या घोषणेवर विरोधकांकडून टीका होत असल्याचे दिसत आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी या निर्णयावर आक्षेप नोंदविला आहे. अशा प्रकारे नोकरीत आरक्षण देणे म्हणजे स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांवर अन्याय असल्याची भूमिका त्यांनी मांडली. इतरही काही नेतेमंडळींनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. पण असे असले तरी एकनाथ शिंदे यांनी मात्र या टीकेवर मौन बाळगले आहे. याचे कारण या निर्णयामागे एक राजकीय गणित असल्याचे विश्लेषक सांगत आहेत.

'गोविंदा'ना नोकरीची संधी

मुंबई, ठाणे, नवी मुंबई यांसह सर्व महानगरपालिका निवडणुकीच्या लवकरच येणार आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचा पाया कमकुवत करण्यासाठी एकनाथ शिंदे यांचा हा निर्णय शिंदे गटाला उपयुक्त ठरू शकतो असे राजकीय जाणकार सांगत आहेत. दहीहंडीला खेळाचा दर्जा दिल्याने, त्यातील सहभागी 'गोविंदा' कोट्याअंतर्गत सरकारी नोकऱ्यांसाठी अर्ज करू शकतील. त्यांना मिळालेल्या रोजगारामुळे शिंदे गटाला आगामी निवडणुकीत मतांच्या रूपाने त्याचा फायदा होऊ शकतो असे बोलले जात आहे.

मुंबई, ठाणे, नवी मुंबईच्या दृष्टीने मास्टरस्ट्रोक?

सरकारच्या या निर्णयामुळे शिवसेनेतील ठाकरे गट अडचणीत सापडल्याचे चित्र आहे. कारण गोविंदांच्या ताफ्यात प्रामुख्याने कनिष्ठ मध्यमवर्गातील मराठी भाषिक तरुणांचा समावेश आहे. हा समाज इतके दिवस शिवसेनेचा मतदार म्हणून ओळखला जातो होता. ठाकरे गटासाठी मुंबईतील हा गट म्हणजे मतरूपी पाठिंबा देणारा पारंपारिक आधार आहे. शेजारच्या ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचा एक सामान्य कार्यकर्ता म्हणून मुख्यमंत्री शिंदे यांनी राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यामुळे आता शिवसेनेचा हा पारंपरिक मतदार आपल्या दिशेने वळवण्यासाठी शिंदे सरकारचा हा निर्णय उपयोगी ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

गोविंदा म्हणजे गुंतवणूक व दीर्घकालीन संपत्ती!

महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्सव विशेषत: मुंबई आणि ठाणे येथे मोठ्या प्रमाणावर साजरा होता. एका राजकीय विश्लेषकाने सांगितले की, "कोणत्याही राजकीय पक्षासाठी एखाद्या प्रदेशात आपला प्रभाव प्रस्थापित करण्यासाठी गोविंदा ही एक संपत्ती (गुंतवणूक) आहे. आर्थिकदृष्ट्याही कोणत्याही नेत्याला किंवा पक्षाला त्यांना निधी देणे किंवा त्यांना प्रोत्साहन देणे ही महागडी गोष्ट नाही. त्यातच निवडणुकीच्या वेळी ते त्यांच्या कामी येतात. प्रदीर्घ काळापासून शिवसेनेने आपली विश्वासार्हता टिकवून ठेवली आहे आणि त्यामुळे गल्लीबोळातील राजकारणात यात त्यांचा हातखंडा आहे. त्यातच आता चढाओढ पाहायला मिळणार आहे.

Web Title: Eknath Shinde Government master plan to declare Dahi Handi adventure sports setback to Uddhav Thackeray Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.