एकनाथ शिंदे, फडणवीस दिल्लीत; मंत्रिमंडळ विस्ताराला आज मिळेल मुहूर्त?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2022 06:37 IST2022-08-06T06:36:57+5:302022-08-06T06:37:15+5:30
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी दुपारी दिल्लीत दाखल होत आहेत. ते काही भाजपच्या नेत्यांशी भेटी घेणार आहेत.

एकनाथ शिंदे, फडणवीस दिल्लीत; मंत्रिमंडळ विस्ताराला आज मिळेल मुहूर्त?
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुन्हा शनिवारी दिल्लीत दाखल होत आहेत. रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार आणि आमदार अपात्रतेबाबत सुप्रीम कोर्टात सुरु असलेली सुनावणी या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वपूर्ण आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी दुपारी दिल्लीत दाखल होत आहेत. ते काही भाजपच्या नेत्यांशी भेटी घेणार आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शनिवारी रात्री दिल्लीत दाखल होत आहे. येत्या रविवारला निती आयोगाची बैठक होणार आहे. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हजेरी लावणार आहेत.
राज्यपालही दिल्लीत
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी सुद्धा शनिवारी दिल्लीत दाखल होत आहेत.
आजादी का अमृत महोत्सवाच्या संदर्भात राष्ट्रपती भवनात शनिवारी सायंकाळी बैठक होणार आहे. या बैठकीला राज्यपाल कोश्यारी उपस्थित राहणार आहेत.