शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
4
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
7
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
8
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
9
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
10
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
11
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
12
"हॅलो! मी CBI अधिकारी बोलतोय, तुमचा मुलगा..."; स्कॅमर्स 'असं' अडकवतात जाळ्यात
13
मुस्लिमांना पूर्ण आरक्षण मिळायलाच हवे; लालू प्रसाद यादव यांचं मोठं विधान
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

कर्जमुक्ती आणि शिवभोजन योजना आणली त्याचा आनंद- एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2020 4:12 AM

राज्यात बारीकशीही घटना घडली नाही, हे आमच्या सरकारचे यश आहे असे मत शिवसेना नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

मुंबई : शेतकऱ्यांची कर्जमुक्ती आणि १० रुपयात शिवभोजन ही योजना आखून त्याची अंमलबजावणी १०० दिवसात पूर्ण झाली याचा सगळ्यात मोठा आनंद माझ्यासारख्या सच्च्या शिवसैनिकास आहे. सीएए , एनआरसी वरुन दिल्लीत काय घडले ते देशाने पाहिले पण महाराष्टÑात बारीकशीही घटना घडली नाही, हे आमच्या सरकारचे यश आहे असे मत शिवसेना नेते व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. त्यांच्याशी झालेली ही बातचित.आज तिघांमधील समन्वय कसा आहे, कुठे सुधारणा करण्याची गरज आहे?उत्तम समन्वय आहे. तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते सातत्याने एकमेकांच्या संपर्कात आहेत. उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री म्हणून घट्ट पकड आहे. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ अनुभवी नेत्यांचे मार्गदर्शन सतत आहे. सरकार स्थापनेनंतर राज्यात ज्या निवडणुका झाल्या त्या आम्ही आघाडी म्हणून लढवल्या आणि उत्तम यश प्राप्त केले. त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही.या सरकारला १०० दिवस पूर्ण झाले. या काळात तुम्हाला जे अपेक्षित होते ते पूर्ण होत आहे का?स्थिर प्रगतिशील सरकार देऊन निर्भय वातावरण निर्माण करणे, विकासाला गती देणे, याला आमचे सर्वोच्च प्राधान्य होते व राहील. शेतकरी कर्जमुक्ती, १० रुपयांत पोटभर जेवण देणारी शिवभोजन योजना आमच्या वचननाम्यातील आणि सरकारच्या किमान समान कार्यक्रमातील महत्त्वाच्या योजना आम्ही अवघ्या १०० दिवसांत कार्यान्वित केल्या. त्याचे लाभ आता थेट शेतकऱ्यांना व गोरगरिब जनतेला मिळू लागले आहेत ही समाधानाची गोष्ट आहे.काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मंत्रीवेगवेगळी विधाने करतात, त्यावर शिवसेना नेते म्हणून तुमची प्रतिक्रिया काय असते, त्याकडे कसे पहाता?प्रत्येकाला मत व्यक्त करण्याचे स्वातंत्र्य लोकशाहीत आहे. सरकारमधील आम्ही सर्व पक्ष लोकशाहीवर विश्वास ठेवणारे आहोत. एखाद्या नेत्याने विधान केले, म्हणजे लगेच तेच सरकारचे धोरण आहे, असे मानणे गैर व अपरिपक्वपणाचे आहे. आघाडीची समन्वय समिती आहे. तिथे प्रत्येक विषयावर चर्चा होते. एकमतानेच निर्णय होतात. कुठलाही विसंवाद नाही. जो काही दिसतो तो विरोधकांनी केलेला अपप्रचार आहे.राष्ट्रवादी व काँग्रेस सोबत जाण्याआधी व नंतर या २ फेजमधला अनुभव कसा आहे, एक दोन उदाहरणांसह सांगाल का?शिवसेना, काँग्रेस, राष्टÑवादी या तिन्ही पक्षाच्या विचारधारा वेगळ्या आहेत. ही अनैसर्गिक आघाडी आहे, हे सरकार टिकणार नाही, अशी टीका केली जात होती. मात्र, राजकीय विचारधारा भिन्न असल्या तरी जनतेचे हित आणि राज्याचा विकास, ही उद्दिष्टे समायिकच आहेत. तिन्ही पक्षांच्या प्रमुखांमध्ये विश्वास व समन्वय आहे. विसंवाद नाही. कुठेतरी एखादे विधान मोठे करून विसंवाद असल्याचे चित्र निर्माण केले जाणे योग्य नाही. प्रत्येक मुद्यावर मुख्यमंत्री यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. तीच सरकारची अंतिम भूमिका असेल.नगरविकास विभागाचे मंत्री म्हणून १०० दिवसात काय वेगळे करू शकलात?मल:निस्सारण व्यवस्थेसाठी याच १०० दिवसात ३ हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत. पुढल्या टप्प्यात आणखी १७ हजार कोटी रुपये उपलब्ध करून दिले जाणार आहेत. पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांना गती देणे, अंमलबजावणीतले अडथळे दूर करण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न गंभीर आहे. त्यावर प्राधान्याने काम करणे गरजेचे आहे.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे