Shahaji Bapu Patil: उद्धव ठाकरेंच्या शब्दावरच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले; शहाजी बापू पाटलांना मोठी शंका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 17:33 IST2022-07-06T17:32:40+5:302022-07-06T17:33:31+5:30

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील याची आम्हाला कोणालाच कल्पना नव्हती. मी गोव्यातील हॉटेलमध्ये झोपलो होतो. तेव्हा माझा पीए पळत पळत आला आणि त्याने बापू जागे व्हा, शिंदे मुख्यमंत्री झालेत, असे सांगितले.

Eknath Shinde became the Chief Minister on the words of Uddhav Thackeray; Big doubts to Famous Shivsena MLa Shahaji Bapu Patil | Shahaji Bapu Patil: उद्धव ठाकरेंच्या शब्दावरच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले; शहाजी बापू पाटलांना मोठी शंका

Shahaji Bapu Patil: उद्धव ठाकरेंच्या शब्दावरच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले; शहाजी बापू पाटलांना मोठी शंका

काय ती झाडी, काय ते डोंगर, काय ते हाटील, एकदम ओकेच, या डायलॉगने फेमस झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटातील आमदारांनी आज एक मोठा दावा केला आहे. शिंदेंनी जेव्हा सांगितले तेव्हा सूरतला मीच पहिला जाऊन पोहोचलो होतो. मविआ सरकार नको अशी सर्वांची भावना होती, सर्वच पक्षात खदखद होती, असे शहाजी बापू पाटील म्हणाले. 

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील याची आम्हाला कोणालाच कल्पना नव्हती. मी गोव्यातील हॉटेलमध्ये झोपलो होतो. तेव्हा माझा पीए पळत पळत आला आणि त्याने बापू जागे व्हा, शिंदे मुख्यमंत्री झालेत, असे सांगितले. मी तसाच नाईट पँटवर धावत धावत खाली गेलो, तेव्हा विश्वास बसला, असा प्रसंग पाटलांनी सांगितला. 

तोवर आम्हाला शिंदे उप मुख्यमंत्री होतील, एवढेच वाटत होते. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होण्यामागे उद्धव ठाकरेच असण्याची शक्यता आहे. ठाकरेंनी तेव्हा एक वाक्य म्हटलेले, शिंदे मुख्यमंत्री होऊन दाखवा. कदाचित त्याच शब्दांवरून शिंदेंना मुख्यमंत्री बनविण्यात आले असेल असे मला वाटते. ठाकरेंनी आव्हान दिलेले. भाजपाने पुढचा विचार करून, गरम घास थंड करून हा निर्णय घेतल्याचे शहाजी बापू पाटील म्हणाले. 

मला आमदार असल्यासारखं अजूनही वाटत नाही. राज्याचा कारभार चांगला चालणार. शरद पवारांवर बोलणार नाही, अजित पवारांवर बोलायला सांगा. ते माझे मित्र आहेत. आम्ही जे केले ते महाराष्ट्रात पहिल्यांदाच घडलेले नाही. पवारांनीही चव्हाणांचे सरकार पाडले होते. सकाळी माझा पाठिंबा आणि दुपारी बंड केले होते, असे शहाजी बापू म्हणाले. एका वृत्तवाहिनीला पाटलांनी मुलाखत दिली.

Web Title: Eknath Shinde became the Chief Minister on the words of Uddhav Thackeray; Big doubts to Famous Shivsena MLa Shahaji Bapu Patil