एकनाथ खडसेंनी केली सरकारची कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2017 03:42 IST2017-07-26T03:42:45+5:302017-07-26T03:42:46+5:30

माझा दाऊदशी, त्याच्या बायकोशी संबंध जोडणारा मनीष भंगाळे बोगस असल्याचे उघड झाले, त्याला अटकही झाली पण राज्यात स्वतंत्र सायबर कायदाच नसल्याने पळवाटांचा आधार घेत तो जामिनावर सुटला

Eknath khadse taking about Independent cyber law | एकनाथ खडसेंनी केली सरकारची कोंडी

एकनाथ खडसेंनी केली सरकारची कोंडी

विशेष प्रतिनिधी 
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : माझा दाऊदशी, त्याच्या बायकोशी संबंध जोडणारा मनीष भंगाळे बोगस असल्याचे उघड झाले, त्याला अटकही झाली पण राज्यात स्वतंत्र सायबर कायदाच नसल्याने पळवाटांचा आधार घेत तो जामिनावर सुटला, असा शाब्दिक हल्ला भाजपाचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी आज विधानसभेत सरकारवरच चढविला.
प्रश्नोत्तराच्या तासात सायबर गुन्ह्यांसंबंधीच्या प्रश्नावरून दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी गृह राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांची कोंडी केली. समाधानकारक उत्तरे येत नसल्याने हा प्रश्न राखून ठेवण्याची मागणी संतप्त विरोधकांनी केली.
काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य बाळासाहेब थोरात यांनी मूळ प्रश्न विचारला होता. तसेच काँग्रेसचे डी.पी.सावंत यांनी सायबर गुन्हासिद्धतेचे प्रमाण किती आहे, अशी विचारणा त्यांनी केली.


खडसे म्हणाले की, सायबर गुन्ह्यात सर्वात जास्त मला भोगावं लागलयं. सगळ्या देशात त्या भंगाळेमुळे माझी बदनामी झाली. आरोपी पकडला असूनही कमकुवत कायद्यामुळे तो सुटला. त्यामुळे कठोर कायदा करा. आपल्या राज्यात स्वतंत्र सायबर कायदाच नसल्याने अशांचे फावते.

सायबर गुन्हे रोखण्यासाठी सरकार करीत असलेल्या उपाययोजनांची यादी राज्यमंत्री पाटील वाचू लागले पण त्याने कुणाचेही समाधान झाले नाही. त्यातच, डॉ. नीलम गोºहे, मनीषा चौधरी या महिला आमदारांना अश्लील कॉल्स् आले. त्यावर सरकारने काय कारवाई केली असा सवाल खडसे यांनी केला. महिला आमदारच सुरक्षित नाहीत, असे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. त्यावर, काँग्रेसच्या यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे, अमिता चव्हाण यांनी शेम शेमच्या घोषणा दिल्या. खडसेंच्या सूचनेनुसार स्वतंत्र कायद्या चा विचार केला जाईल, असे पाटील म्हणाले.

Web Title: Eknath khadse taking about Independent cyber law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.