शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

"कारस्थान कुठवर सहन करणार? फडणवीसांनी मला पक्ष सोडण्यास भाग पाडलं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2020 06:59 IST

स्वत: खडसे यांनी मुक्ताईनगर येथील फार्म हाउसवर तातडीने पत्रकार परिषद आयोजित करून आपला निर्णय जाहीर केला. ते म्हणाले, मला आजवर खूप पदे मिळाली. त्यामुळे पक्ष अथवा दिल्लीतील नेतृत्वाविरुद्ध माझी तक्रार नाही.

ठळक मुद्देज्या पक्षासाठी आजवर आपण कष्ट केले तिथेच आपल्याविरुद्ध कटकारस्थान होणार असेल तर ते कुठवर सहन करणारस्वत: खडसे यांनी मुक्ताईनगर येथील फार्म हाउसवर तातडीने पत्रकार परिषद आयोजित करून आपला निर्णय जाहीर केला.अंजली दमानिया यांनी माझ्याविरुद्ध विनयभंगाचा खोटा खटला कोर्टात दाखल केला. पोलीस तयार नसताना फडणवीस यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

मुक्ताईनगर (जि. जळगाव) : आपण भाजपच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे. ज्या पक्षासाठी आजवर आपण कष्ट केले तिथेच आपल्याविरुद्ध कटकारस्थान होणार असेल तर ते कुठवर सहन करणार, असा सवाल एकनाथ खडसे यांनी केला.

स्वत: खडसे यांनी मुक्ताईनगर येथील फार्म हाउसवर तातडीने पत्रकार परिषद आयोजित करून आपला निर्णय जाहीर केला. ते म्हणाले, मला आजवर खूप पदे मिळाली. त्यामुळे पक्ष अथवा दिल्लीतील नेतृत्वाविरुद्ध माझी तक्रार नाही.

अंजली दमानिया यांनी माझ्याविरुद्ध विनयभंगाचा खोटा खटला कोर्टात दाखल केला. पोलीस तयार नसताना फडणवीस यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. यासंदर्भात आपण फडणवीस यांच्याकडे विचारणा केली असता ती महिला गोंधळ करत होती म्हणून नाइलाजाने मला आदेश द्यावे लागले, असे उत्तर मला मिळाले. सुदैवाने पंधरा दिवसांपूर्वीच या गुन्ह्यातून निर्दोष मुक्त झालो आहे.

मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतरही आपण चार वर्षे वाट पाहिली. पण सतत अन्याय करण्यात आला. पीएने लाच मागितल्याच्या कथितप्रकरणात माझ्यावर नऊ महिने पाळत ठेवण्यात आली, असेही खडसे यांनी सांगितले.

फडणवीसांनी पक्ष सोडण्यास मला भाग पाडले -माझा रोष देवेंद्र फडणवीस यांच्यावर आहे. त्यांनी पक्ष सोडण्यास भाग पाडले. कारण, ते मुख्यमंत्री झाल्यानंतरच मला राजकीय जीवनातून संपवण्याचे काम सुरू झाले. ‘मुख्यमंत्री पदावर बहुजन व्यक्ती असावी,’ असे ज्या वेळेस मी म्हटले त्या वेळेपासून हे षड्यंत्र रचले गेले व अनेक प्रकरणे माझ्यामागे लावण्यात आली, असा आरोपही खडसे यांनी केला.

मला व्हिलन ठरवलं जातंय : फडणवीसऔरंगाबाद : एकनाथ खडसे अर्धसत्य सांगत आहेत. अशावेळी कोणाला तरी व्हिलन ठरवावे लागते. त्यानुसार मला व्हिलन ठरवत आहेत. माझ्याबाबत काही समस्या होती तर त्यांनी तशी तक्रार वरिष्ठांकडे करायला हवी होती, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खडसे यांच्या पक्षांतरावर औरंगाबादेत प्रतिक्रिया दिली. खडसे यांच्यामुळे पक्षाचे कितपत नुकसान होईल, असे विचारले असता फडणवीस म्हणाले, काहीना काही नुकसान होत असतं; परंतु भाजप हा मोठा पक्ष आहे. कोणाच्या जाण्याने थांबत नाही किंवा येण्याने इकडेतिकडे होत नाही.

पक्ष सोडतील असे वाटले नव्हतेएकनाथ खडसे यांनी पक्ष सोडू नये यासाठी आम्ही शेवटपर्यंत प्रयत्न केले. मात्र आमचे प्रयत्न यशस्वी ठरले नाहीत. कितीही रागावले तरी ते पक्ष सोडतील असे वाटत नव्हते. त्यांच्या नाराजीच्या मुद्द्यांवर काही ना काही मार्ग निघेल असे वाटत होते. नाथाभाऊ ज्या पक्षात जातील तेथे त्यांनी जनतेचे प्रश्न मांडावेत.- चंद्रकांत पाटील, प्रदेशाध्यक्ष, भाजप 

टॅग्स :eknath khadseएकनाथ खडसेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेस