एकनाथ खडसेंना छातीत त्रास; एअर ॲम्ब्युलन्सद्वारे उपचारासाठी मुंबईला दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2023 06:18 IST2023-11-06T06:17:49+5:302023-11-06T06:18:01+5:30
रविवारी रात्री त्यांना एअर ॲम्ब्युलन्सद्वारे मुंबईला उपचारासाठी नेण्यात आले.

एकनाथ खडसेंना छातीत त्रास; एअर ॲम्ब्युलन्सद्वारे उपचारासाठी मुंबईला दाखल
जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांना छातीत त्रास होत असल्याने जळगाव शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी रात्री त्यांना एअर ॲम्ब्युलन्सद्वारे मुंबईला उपचारासाठी नेण्यात आले.
बाॅम्बे हाॅस्पिटलमध्ये त्यांच्या पुढील तपासण्या हाेतील. मुक्ताईनगरला खडसेंच्या छातीत दुखायला लागले. त्यांना गजानन हार्ट हाॅस्पिटल येथे दाखल करण्यात आले. त्यांच्या तपासण्या करण्यात आल्या असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे.
खडसेंची प्रकृती बिघडल्याचे माहिती पडताच रुग्णालयात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली होती. खडसेंची प्रकृती बिघडल्याची माहिती त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कळविल्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी तातडीने एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले.