भाजपाच्या निवडणूक समितीतून एकनाथ खडसेंना डच्चू; गिरीश महाजनांची वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2019 10:25 PM2019-03-16T22:25:47+5:302019-03-16T22:29:34+5:30

भाजपाचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांना निवडणूक व्यवस्थापनाच्या मुख्य समितीतून डच्चू देण्यात आला आहे. मात्र, या समितीमध्ये गिरीश महाजन यांची वर्णी लावण्यात आली आहे.

Eknath Khadase dropped from BJP's election committee | भाजपाच्या निवडणूक समितीतून एकनाथ खडसेंना डच्चू; गिरीश महाजनांची वर्णी

भाजपाच्या निवडणूक समितीतून एकनाथ खडसेंना डच्चू; गिरीश महाजनांची वर्णी

Next
ठळक मुद्देभाजपाचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांना निवडणूक व्यवस्थापनाच्या मुख्य समितीतून डच्चू देण्यात आला आहे.या समितीमध्ये गिरीश महाजन यांची वर्णी लावण्यात आली आहे. निवडणूक जाहिरनामा समितीचे नेतृत्व ग्रामिण विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे देण्यात आले आहे.

मुंबई : भाजपाचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांना निवडणूक व्यवस्थापनाच्या मुख्य समितीतून डच्चू देण्यात आला आहे. मात्र, या समितीमध्ये गिरीश महाजन यांची वर्णी लावण्यात आली आहे. तर विशेष संपर्क अभियान समितीत मात्र एकनाथ खडसे यांच्यासह प्रकाश मेहता व शायना एनसी यांना स्थान देण्यात आलेले आहे.

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणनीती व नियोजनासाठी ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली भाजपाच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक झाली.  यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे, नितिन गडकरी, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार आदी मंत्री उपस्थित होते. या बैठकीत निवडणूक जाहिरनामा समितीचे नेतृत्व ग्रामिण विकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे देण्यात आले आहे. तर विजन डॉक्यूमेंट समितीच्या प्रमूखपदी पक्ष प्रवक्ता विश्वास पाठक यांची निवड करण्यात आली आहे. 

निवडणूक प्रचार रॅली आयोजनाची जबाबदारी संभाजी पाटील निलंगेकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तर परिषद आणि बैठकांच्या नियोजनाची जबाबदारी राम शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे. तसेच या बैठकीत पक्षातर्फे लोकसभा निवडणुकीसाठी कायदेशीर प्रकरणे, साहित्य प्रचार, मत मूल्यांकन, निवडणूक संस्था, माहिती आणि जनसंपर्क, बुथ समन्वय आणि वॉर रुम मॅनेजमेंट अशा वेगवेगळ्या २२ समित्यांची स्थापना करण्यात आली आहे.

भाजपाच्या समन्वय समितीमधूनही एकनाथ खडसे यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे नाराज झालेले एकनाथ खडसे या बैठकीला उपस्थित नव्हते. दरम्यान, एकनाथ खडसे यांना समितीतून का वगळण्यात आले, अशी विचारणा केली असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. 

Web Title: Eknath Khadase dropped from BJP's election committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.