शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता करारासाठी कोणीही जिवंत राहणार नाही, युरोपला युद्ध हवे असेल तर रशिया तयार'; पुतिन यांचा युरोपला थेट इशारा
2
Nanded Crime: 'त्यांनी' सक्षमला बर्थडेला दिलं होतं गुलाबाचं 'काटेरी' झाड! हत्येचेच दिले होते संकेत; आईने सगळंच सांगितलं
3
झारखंडमध्ये राजकीय उलथापालथ? हेमंत सोरेन अन् भाजपाच्या नव्या मैत्रीची चर्चा, पडद्यामागे हालचाली
4
Viral: रुग्णवाहिकेला येण्यास उशीर, लोकांनी हार आणि नारळ देऊन केला चालकाचा सत्कार, कुठं घडलं?
5
दोन गिधाडांची गोष्ट... जन्म हरयाणात, मुक्तता महाराष्ट्रात आणि स्थायिक मध्य प्रदेशात
6
Mumbai Crime: पोटच्या मुलीचा ब्लेडने गळा चिरला, वाचवायला गेलेल्या पत्नीवरही हल्ला; कशामुळे घडलं?
7
फ्लॅट सुरुवातीनंतर शेअर बाजार 'धडाम'! सेन्सेक्स १६० अंकांनी आपटला; निफ्टीही २५,९५८ च्या खाली
8
कोण आहे देवव्रत रेखे? अवघ्या १९ व्या वर्षी पूर्ण केलं दंडक्रम पारायण; मोदी-योगींनीही नावाजलं
9
कन्यादान होताच प्राजक्ताला अश्रू अनावर, लग्नातील भावुक करणारा क्षण, व्हिडीओ पाहून डोळ्यात येईल पाणी
10
धर्मेंद्र यांच्या अस्थी विसर्जनासाठी देओल कुटुंब हरिद्वारमध्ये; सनी-बॉबी VIP घाटावर करणार विधी
11
पलाश मुच्छल प्रेमानंद महाराजांच्या आश्रमात, स्मृती मंधानासोबतच्या लग्नावर अजूनही मौनच
12
Ola-Uber ला टक्कर देण्यासाठी आली 'भारत टॅक्सी'; 'या' ठिकाणी ट्रायल सुरू, १० दिवसांत ५१ हजार चालकही जोडले
13
Canara Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹७९,५०० चं फिक्स व्याज; पाहा कोणती आहे ही स्कीम
14
भाजपानं सोनिया गांधींना निवडणुकीच्या मैदानात उतरवलं; काँग्रेस उमेदवारासमोर उभं केलं आव्हान
15
धक्कादायक! ५ वर्षांत २ लाख खासगी कंपन्या बंद, केंद्र सरकारचा लोकसभेत खुलासा
16
BHU मध्ये रात्री उशिरा राडा, विद्यार्थी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये दगडफेक, नेमकं काय घडलं?
17
'एका हॉटेलचे बिल दुसऱ्या हॉटेलमध्ये देता का?', कर्तव्यनिष्ठ महिला पोलिसाच्या कामगिरीची वरिष्ठांकडून दखल
18
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
19
‘संचार साथी’वर गदारोळ! नको असेल तर डिलीट करा; सरकारचा बचावात्मक पवित्रा
20
"आगाऊ मेंटेनन्स घेणे हे बेकायदा कृत्य; वसुली थांबवण्याचे निर्देश ‘महारेरा’ने बिल्डरांना द्यावेत"
Daily Top 2Weekly Top 5

दोन महिलांसह आठजणांना अटक

By admin | Updated: October 23, 2014 23:06 IST

सांगेली येथे बिबट्याची शिकार : गवसे येथे कातड्याची विक्री करणाऱ्या दोघांना रंगेहाथ पकडले

आजरा : सांगेली (ता. सावंतवाडी) येथे पंधरा दिवसांपूर्वी बिबट्याची शिकार करून त्याची कातडी विक्रीसाठी नेणाऱ्या दोघांना गडहिंग्लज पोलिसांनी गवसे येथे आजरा साखर कारखान्यासमोर रंगेहाथ पकडले. संभाजी रामदास साळुंखे (वय ३२, रा. बुधगाव, ता. मिरज, जि. सांगली) व तानाजी रंगराव पाटील (४५, रा. माणिकवाडी, ता. वाळवा, जि. सांगली) अशी या दोघांची नावे असून, याप्रकरणी पोलिसांनी दोन महिला व तीन शिकाऱ्यांसह आठजणांना अटक केली आहे. गडहिंग्लजचे उपविभागीय पोलीस अधिकारी सागर पाटील यांनी दिलेली माहिती अशी की, पोलीस खबऱ्यांकडून सांगेली (ता. सावंतवाडी) येथे नीलेश राजाराम नार्वेकर (५०), विशाल परशुराम नार्वेकर (२४) व चंद्रकांत भुजू राऊळ (७३) यांनी पंधरा दिवसांपूर्वी बिबट्याची हत्या केली होती. त्याचे कातडे मोहन नानासाहेब देसाई (५०, रा. सुलगाव, ता. आजरा) व आक्काताई जनार्दन सणगर (५५, रा. के. बी. पी. कॉलेजजवळ, इस्लामपूर) या मध्यस्थांतर्फे विक्रीसाठी साळुंखे व पाटील हिरो होंडा मोटारसायकल (एमएच १० बीटी २७०४)वरून घेऊन निघाले होते.यावेळी गडहिंग्लज पोलिसांनी सापळा रचून साळुंखे व पाटील यांना गवसे येथे रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून बिबट्याची कातडी व दुचाकी जप्त केली आहे. बिबट्याची हत्या करणाऱ्या सांगेली येथील आरोपींनी विनापरवाना वापरलेली १८ हजार रुपयांची सिंगल बार काडतुसी बंदूक आणि काडतुसेही पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. याप्रकरणी पोलिसांनी मध्यस्थ, कातडी विक्रीसाठी नेणारे दोघेजण, सांगेली येथील शिकारी, तेथील अंजली राजाराम नार्वेकर (५०) हिच्यासह एकूण आठजणांना अटक केली आहे. गडहिंग्लज न्यायालयात उभे केले असता संभाजी साळुंखे, तानाजी पाटील, मोहन देसाई यांना एक दिवसाची पोलीस कोठडी, तर उर्वरित आरोपींना न्यायालयीन कोठडी दिली आहे. ही कारवाई गडहिंग्लजचे पोलीस निरीक्षक रामदास इंगवले, उपनिरीक्षक सोमनाथ दिवटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. (प्रतिनिधी)आजरा पोलीस करतात तरी काय ?सावंतवाडी-आजरा-सांगली हा मार्ग अवैध वाहतुकीचा मार्ग बनल्याचे गेल्या अनेक दिवसांतील घटनांवरून स्पष्ट झाले आहे. मात्र, यामध्ये स्थानिक आजरा पोलीस कुठेच दिसले नाहीत. कोल्हापूरहून पोलीस निरीक्षक यशवंत केडगे यांनी पकडलेला चरस, तर कधी उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांकडून कारवाई झाली आहे. त्यामुळे आजरा पोलीस करतात तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.