CoronaVirus News: राज्यात दिवसभरात आणखी आठ ओमायक्रॉन रुग्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2022 07:03 IST2022-01-17T07:02:21+5:302022-01-17T07:03:20+5:30
दिवसभरात नोंद झालेल्या आठ रुग्णांमध्ये पुणे मनपा ५ आणि पिंपरी-चिंचवड येथील ३ रुग्णांचा समावेश आहे.

CoronaVirus News: राज्यात दिवसभरात आणखी आठ ओमायक्रॉन रुग्ण
मुंबई : राज्यात रविवारी आठ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेने रिपोर्ट केले आहेत. आतापर्यंत राज्यात एकूण १,७३८ ओमायक्रॉन विषाणूबाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. यापैकी ९३२ रुग्णांना त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. दिवसभरात नोंद झालेल्या आठ रुग्णांमध्ये पुणे मनपा ५ आणि पिंपरी-चिंचवड येथील ३ रुग्णांचा समावेश आहे.
राज्यात १ नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचेदेखील क्षेत्रीय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ४,८८८ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ७७ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे, अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.