फटाक्याच्या कारखान्यांवर वीज पडून आठ ठार
By Admin | Updated: July 9, 2014 02:33 IST2014-07-09T02:33:33+5:302014-07-09T02:33:33+5:30
कारखान्यांवर वीज पडून झालेल्या भीषण स्फोटात आठ ठार, तर पाचजण गंभीर जखमी झाल़े ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तेरखेडा (जि़उस्मानाबाद) येथे घडली़

फटाक्याच्या कारखान्यांवर वीज पडून आठ ठार
दत्ता गायके - येरमाळा
दोन फटाका कारखान्यांवर वीज पडून झालेल्या भीषण स्फोटात आठ ठार, तर पाचजण गंभीर जखमी झाल़े ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तेरखेडा (जि़उस्मानाबाद) येथे घडली़ जखमींना बार्शी येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आह़े भिंत कोसळल्याने काहीजण मातीच्या ढिगा:याखाली अडकले असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आह़े
मृतांमध्ये मिलिंद बाबूराव मस्के, सोनू नंदू फडतारे, सायरा पठाण, शबाना पठाण, लतीफा पठाण, अमिना मुजावर, लतीफा मुलाणी, शबाना मुलाणी यांचा समावेश आहे, तर महादेव शिवाजी सरवदे, श्रीरंग पांडुरंग अरूणो, बालाजी शेषेराव शिंदे, महादेव ज्ञानोबा सरवदे, रतनबाई घोलप अशी गंभीर जखमींची नावे आहेत़
तेरखेडा गावाजवळ फरीद पठाण यांचे प्रिन्स फायर वर्क्स हा फटाके निर्मितीचा कारखाना आह़े या कारखान्यात मंगळवारी दुपारी मिलिंद बाबूराव मस्के (3क्), नंदू बंडू फडतारे (2क्) यांच्यासह महादेव शिवाजी सरवदे (3क्), श्रीरंग पांडुरंग अरूणो (3क्), बालाजी शेषेराव शिंदे (32), महादेव ज्ञानोबा सरवदे (4क्) व इतर कामगार काम करीत होत़े तर सटवाईवाडी शिवारात पिन्नू पठाण यांच्या फटाक्यांच्या कारखान्यात सायरा पठाण (क्5), शबाना पठाण (4क्), लतीफा पठाण (29), अमिना मुजावर (55), लतीफा मुलाणी (3क्), शबाना मुलाणी (35), रतनबाई घोलप (35) यांच्यासह इतर काहीजण काम करीत होत़े कारखाना परिसरात सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जोरदार पाऊस सुरू झाला़ या पावसात दोन्ही कारखान्यांवर वीज पडल्याने भीषण स्फोट झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. घटनेनंतर भरपावसातही ग्रामस्थांनी मदतीसाठी दोन्ही ठिकाणी गर्दी केली होती़ (प्रतिनिधी)
च्उस्मानाबाद जिल्ह्यात मंगळवारी दिवसभर संततधार सुरू आह़े तेरखेडा परिसरातही मोठा पाऊस झाला़ पावसामुळे उस्मानाबाद-तेरखेडा मार्गावरील तेरणा नदीला पूर आला होता़
च्त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाल्याने वेळेत मदत पोहचण्यास उशीर झाला़ तेरखेडय़ापासून आतमध्ये
4 किलोमीटर अंतरावर हे कारखाने आहेत़ त्यामुळे तेरखेडय़ाहून घटनास्थळी पोहोचण्यातही अनेक अडचणी येत होत्या़