शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आघाडी सरकार टिकवण्यासाठी प्रयत्न; राष्ट्रवादी अखेरपर्यंत मुख्यमंत्र्यांसोबत - जयंत पाटील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2022 15:07 IST

Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसची 'सिल्व्हर ओक'वर  बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी नेत्यांनी चर्चा केली. 

मुंबई : शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाचा झेंडा हाती घेतल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण अस्थिर झाले आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकारणाला वेगळे वळण लागले आहे. आता राज्यातही राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येते आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची 'सिल्व्हर ओक'वर  बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याशी नेत्यांनी चर्चा केली. 

याबाबतची माहिती राष्ट्रवादी कॉग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी गुरुवारी प्रसार माध्यमांना माहिती दिली. यावेळी शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि आमदारांना महाविकास आघाडी सरकार टिकण्यासाठी प्रयत्न करा, असा आदेश दिला असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. तसेच, "शिवसेनेत अंतर्गत काय सुरु आहे, याची मला माहिती नाही, राष्ट्रवादीचे सर्व आमदार उद्धव ठाकरे यांना सहकार्य करतील. राष्ट्रवादी अखेरपर्यंत मुख्यमंत्र्यांसोबत असेल," असे जयंत पाटील म्हणाले.

याचबरोबर, "मुंबईतील शिवसेनेचे आमदार गुवाहाटीला जाणार नाहीत, असे वाटत होते. तसेच, ते फुटतील अशी अपेक्षा नव्हती. काल मुख्यमंत्र्यांनी वर्षा बंगला सोडला आहे, मुख्यमंत्रीपद नाही," असेही जयंत पाटील म्हणाले. याशिवाय, आजच्या सध्याचा राजकीय घडामोडींवर चर्चा झाली. महाविकास आघाडी सरकार टिकावं, यासाठी चर्चा झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहटी येथे गेलेले आमदार परत येतील, असा आम्हाला विश्वास आहे. उद्धव ठाकरे यांना आमचा पाठिंबा आहे. सरकार टिकविण्यासाठी सर्व प्रयत्न आम्ही करणार आहोत, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्यात अनेक नाट्यमय घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेचे वरिष्ठ नेतृत्त्व कमालीचे अस्वस्थ झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला खिंडार पाडत जवळपास ४० हून अधिक आमदारांचा एक मोठा गट आपल्या सोबत उभा केला आहे. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर होण्याची चिन्हे आहेत.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्र