मराठीच्या संवर्धनासाठी प्रयत्न - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2018 01:24 IST2018-03-18T01:24:29+5:302018-03-18T01:24:29+5:30

मराठी भाषेच्या विकास आणि संवर्धनासाठी शासनाचे सदैव सकारात्मक प्रयत्न राहतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सांगितले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या शिष्टमंडळाने मराठी भाषा विकास व संवर्धनाच्या दृष्टीने विविध धोरण व उपाययोजनांचे निवेदन मुख्यमंत्री फडणवीस व मराठी भाषा आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांना विधानभवन येथे सादर केले. या वेळी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

 Efforts to promote Marathi - Chief Minister Devendra Fadnavis | मराठीच्या संवर्धनासाठी प्रयत्न - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मराठीच्या संवर्धनासाठी प्रयत्न - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : मराठी भाषेच्या विकास आणि संवर्धनासाठी शासनाचे सदैव सकारात्मक प्रयत्न राहतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी सांगितले. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या शिष्टमंडळाने मराठी भाषा विकास व संवर्धनाच्या दृष्टीने विविध धोरण व उपाययोजनांचे निवेदन मुख्यमंत्री फडणवीस व मराठी भाषा आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांना विधानभवन येथे सादर केले. या वेळी झालेल्या चर्चेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.
बडोदे येथील ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी, मुंबई साहित्य संघाच्या अध्यक्षा उषा तांबे, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष डॉ. मिलिंद जोशी यांच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री फडणवीस, तावडे यांच्याशी मागण्यांच्या अनुषंगाने चर्चाही केली. यावेळी मराठी भाषा विभागाचे सचिव भूषण गगराणीही उपस्थित होते. चर्चेत शिष्टमंडळाने मराठी शिक्षण कायदा, मराठी भाषा विकास प्राधिकरण स्थापना, भाषा विभागाची पुनर्रचना, तालुका तेथे सांस्कृतिक संकुल या मागण्यांबाबत मांडणी केली.

Web Title:  Efforts to promote Marathi - Chief Minister Devendra Fadnavis