शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
5
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
6
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
7
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
8
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
9
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
10
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
11
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
12
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
13
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
14
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
15
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
16
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
17
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
18
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
19
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
20
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा

Maharashtra Election 2019; सत्ताधाºयांकडून खोटा इतिहास पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू : शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2019 3:14 PM

शरद पवार यांची पंढरपुरात जाहीर सभा; सरकारी यंत्रणांचा विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी वापर

ठळक मुद्दे- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार सभेसाठी शरद पवार सोलापूर जिल्हा दौºयावर- माजी केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी घेतली शरद पवारांची भेट- विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आला वेग; आरोप प्रत्यारोपांनी गाठली खालची पातळी

पंढरपूर : इयत्ता चौथीच्या इतिहासाच्या पुस्तकातून शिवाजी महाराजांचा धडा सरकारने काढून टाकला. नव्या पिढीला हे काय शिकवणार आहेत? मुलांवर चांगले संस्कार घडविण्याचे काम हे प्राथमिक शिक्षणातून होत असते. सत्तेत बसलेली मंडळी खोटा इतिहास पुढे करतील, अशा प्रवृत्तींना दूर हटवा असे सांगत, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपा-शिवसेना सरकारवर निशाणा साधला.

पंढरपूर येथील येथील शिवाजी चौक येथे आयोजित प्रचार सभेत पवार बोलत होते. आज कोणी सरकारच्या विरोधात आवाज उठवला की त्याला लगेच नोटीस पाठवली जाते. ईडी तसेच इतर यंत्रणांचा वापर हा विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केला जात आहे. धमकी आम्हाला देऊ नका, सत्तेचा वापर हा जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी करा, विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी करू नका. असेही शरद पवार म्हणाले.

 केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सोलापुरात येऊन विचारत शरद पवारांनी काय केलं, अमित शहा यांना पाच वर्षापूर्वी कोण ओळखत होत का? असा सवाल करून, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारात वारसा पुढे घेऊन जात महाराष्ट्रात शेती-उद्योग, सहकार, शैक्षणिक क्षेत्रात आम्ही काम केले. सर्वसामान्यांच्या हिताची जपणूक केली. स्त्रियांना आरक्षण दिलं,  अठरापगड जातींना अधिकार देण्याचे काम केले. भाजपाने गेल्या पाच वर्षात दिलेले कोणतेही आश्वासन पाळत नसल्याचे पवार म्हणाले.

 २०० बड्या भांडवलदारांची सुमारे ८१ हजार कोटी थकलेली कर्जाची रक्कम सरकारने माफ केली. बँका वाचवण्यासाठी केल्याचे हे सांगत आहेत. राज्यातील शेतकºयांना सरसकट कर्जमाफी मिळाली नसल्याचे पवार म्हणाले.  केंद्रात कृषी मंत्री असताना आपण कांदा उत्पादकांना चार पैसे जादा मिळावेत, यासाठी कांदा निर्यातबंदी उठवली होती. आज शासन थोडा कांद्याचा दर वाढला की निर्यातबंदी लागू करत आहे. सरकारचे हे धोरण शेतकरीविरोधी असल्याचे पवार म्हणाले.

टॅग्स :Solapurसोलापूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकSharad Pawarशरद पवारBJPभाजपाPoliticsराजकारणAmit Shahअमित शहा