वर्गाबाहेर नग्नावस्थेत उभे राहण्याची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2016 05:04 IST2016-03-13T05:04:49+5:302016-03-13T05:04:49+5:30

शिकवणीचा अभ्यास केला नाही म्हणून दोन चिमुकल्यांना अर्धा तास वर्गाबाहेर नग्नावस्थेत उभे केल्याची घृणास्पद घटना मालवणी परिसरात शनिवारी उघड झाली. या घटनेचे व्हिडीओ व्हायरल होताच

Education to stand in nakedness outside the classroom | वर्गाबाहेर नग्नावस्थेत उभे राहण्याची शिक्षा

वर्गाबाहेर नग्नावस्थेत उभे राहण्याची शिक्षा

मुंबई : शिकवणीचा अभ्यास केला नाही म्हणून दोन चिमुकल्यांना अर्धा तास वर्गाबाहेर नग्नावस्थेत उभे केल्याची घृणास्पद घटना मालवणी परिसरात शनिवारी उघड झाली. या घटनेचे व्हिडीओ व्हायरल होताच या प्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात श्री ट्युटोरिअल्सविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
येथे १०वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची खासगी शिकवणी घेतली जाते. याच ठिकाणी हे विद्यार्थी शिकवणीसाठी येत होते. शिकवणीचा गृहपाठ पूर्ण न केल्यामुळे दोघांना नग्नावस्थेत वर्गाबाहेर उभे करण्यात आले. त्यात रस्त्यावरच ही शिकवणी असल्याने सर्वाच्यांच नजरा त्यांच्यावर खिळल्या. वर्गाबाहेर नग्नावस्थेत रडत असलेल्या या चिमुरड्यांचा काही जणांनी व्हिडीओ शूट केला. या ट्युटोरिअल्सच्या घृणास्पद शिक्षेविरुद्ध आता सर्व स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Education to stand in nakedness outside the classroom